लोहा| परभणी जिल्ह्यातील पालम शहरापासून सात किलो अंतरावर असलेल्या व पूर्णा तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीपत्रात मध्यभागीनिसर्गरम्य वृक्षवेली, जांभळाने वेढलेले अद्भुत नयनरम्य असे ‘जांभूळबेट’ (natural purple island) आहे. पण प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ,नैसर्गिक पुराचा तडाखा यामुळे २२ एकर असलेले हे बेट आता ९ एकर पुरतेच उरले आहे. गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर ते तेलंगणा राज्य या दरम्यान नदीप्रवाह मार्गात कुठेच बेट नाही परंतु राज्य सरकार व लोकप्रतिनिधीची निष्क्रियता पाहता जांभूळ बेटाचे अस्तित्व येत्या काही वर्षात नामशेष होणार आहे. गरज आहे ती संवर्धनाची व संगोपनाची..!

पालम – पूर्णा तालुक्याच्या सीमेवरील जांभूळ बेटाचा शोध कसा , कधी लागला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही ,पण पालम तालुक्याचे रहिवाशी निसर्गप्रेमी रमेश पिठ्ठलवाड बेटावर जांभळाची भरपूर प्रमाणात झाडे होती. म्हणून या बेटाला ‘जांभूळबेट’ असे नाव पडले. असे त्यांनी सांगितले. अतिशय विलोभनीय असे सुंदर बेट आता नऊ एकरावर निसर्गाच्या आघाताचा व राज्य सरकारच्या उदासीनतेच सामना करत उभे आहे. पूर्वी नदीपात्र उन्हाळ्यात कोरडे पडायचे त्यामुळे बेटाच्या चहूबाजूने वाळूतून फिरता येत होते. एवढेच नाही तर पुढे पूर्वेला आणि पश्चिमेला गोदावरी नदी मूळ प्रवाहात अशी मिळते हे पाहता येत होते. पण पालम तालुक्यातील दिग्रस येथे गोदावरीवर बंधारा बांधण्यात झाला आणि त्याचे बॅक वॉटर दूरवर गेले त्यामुळे बारमाही पाण्याचा वेढा या जांभूळ बेटला असतो.

त्यामुळे शालेय सहली तसेच निसर्गप्रेमी यांच्यासाठी आकर्षक ,अद्वितीय असे निर्सग रम्य पर्यटनस्थळ बनले आहे. निसर्गाने वेढलेले हे जांभूळबेट नऊ एकरात राज्य सरकार व लोकप्रतिनिधी याच्या दुर्लक्षितपणामुळे अस्तित्वाशी झुंज देत उभे आहे. बेटाच्या मध्यभागी पुरातन मारुती मंदिरआहे. चारी बाजूंनी नदीपात्रात झुळझुळ पाहणारे विविध पक्षी, उंच झाडे, वृक्षवेली, त्यातूनच जाणारी नागमोडी पाऊल वाटा निसर्गाचा अद्भुत नजरा मनमोहून टाकणारा आहे. बेटावर जाण्यासाठी नाममात्र दरात जांभुळबेट संवर्धन समितीची एकावेळी 35 जण घेऊन जाणारी बोट आहे…संदिप।दुधाटे व अर्जुन दुधाटे गोळेगावकर हे समर्पित व सहकार्यवृत्तीने होडीतून बेटावर पर्यटक ने आण करतात.

बेटावर मुलांना खेळण्या घसरगुंडी, सिसॉ, झोके (झुले) तसेच सेल्फी पॉईंट आहे. बेटावर, हातपंप आहे… दोन स्वच्छतागृह, उभारले आहे. जुने हनुमान मंदीर, समोर मोठे पत्र्याचे शेड आणि अनेक सिमेंटचे बाक जांभूळ बेट संवर्धन समितीने सुविधा केली आहे तसेच स्वयंपाक करण्यासाठी सर्व साहित्य मोफत उपलब्ध असते दुधाटे हे या बेटाचे संगोपन व संवर्धन कोणत्याची आर्थिक पाठबळा शिवाय करत आहेत.

जांभूळ बेटावर कसे जावे
पालम शहरापासून पाच किमी पूर्वेला सोमेश्वर गाव लागते यागावच्या नदीकाठावरून बोटीने बेटावर जाता येते पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे मार्गे गोळेगाव नदीकाठावरून जांभूळ बेटावर जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो. पालम जवळच “फळा ” हे संत मोतीराम महाराज यांचे समाधी स्थळ असलेले धार्मिक गाव आहे निसर्गाने बहरलेल्या बेटावर दुर्मीळ औषधी वनस्पती, फळ-फुलांची झाडे आहेत.तिन्ही ऋतूत पर्यटक या बेटाला भेट देत असतात. तिन्ही ऋतूत जांभूळबेटाचा नजारा डोळ्यांत साठवण्यासारखा असतो.
जांभूळबेट संवर्धनासाठी उपयोजन कधी (?)
या बेटाचे संवर्धन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि आणि पर्यावरणप्रेमी आता एकत्र आले पण फार काही सुधारणा व्यवस्था येथे नाहीत परभणी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींसह नांदेडच्या वृक्षमित्र फाऊंडेशनने यासाठी जांभूळबेट संवर्धन मोहीम सुरू केली पण अजून पाहिजे तसा व्यवस्था येथे उपलब्ध नाहीत कृषिभूषण कांतराव झरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरखेड, सोमेश्वर, देऊळगाव दुधाटे, गोळेगाव येथील तरुणवर्ग आणि नांदेड येथील वृक्षमित्र फाऊंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येथे काही प्रमाणात काम सुरू केले आहे.
जांभूळबेट संवर्धन मोहिमेत . बेटावर जांभूळ वृक्षांसह बांबू, मोहगणी, सीताफळ, तुती आदी वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे दुधाटे यांनी सांगितले , बेट स्वच्छता, मारुती मंदिर परिसरासमोर निवारा उभारणी असे उपक्रम राबविण्यात आले विशेषतः 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम होतेबेटावर राष्ट्रगीत गुंजते.
पर्यटनस्थळाचा विकास व्हावा
कांतराव झरीकर व टीमने जांभूळ बेट संवर्धनासाठी जो पुढाकार घेतला त्यामुळेच पर्यटक वाढ झाली पण शासन स्तरावर जी उदासीन आहे. त्यामुळे बेट नामशेष होण्याच्या दिशेने जात आहे. विद्यार्थी सहल घेऊन गेलेले मुख्याध्यापक दामोदर वडजे यांनी जांभूळ बेट संगोपन व संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले. मराठवाड्यात एकमेव असलेल्या नैसर्गिक जांभूळबेटाचा विकास झाला तर स्थानिकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील अशी प्रतिक्रिया संदीप दुधाटे व अर्जुन दूधाटे गोळेगावकर यांनी दिली.