नांदेड l महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न द्या या मागणीचे निवेदन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना यांना आज देण्यात आले.

यावेळी जगद्गुरु संत सेवालाल महाराज फाउंडेशन नांदेड, डॉक्टर मथुरा दास बजाज उद्यान समिती दक्षिणमुखी हनुमान मंदिर नांदेड, वीज कामगार को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड, माजी अध्यक्ष राजकुमार जाधव वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना,केंद्रीय मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष, भारतीय बंजारा कर्मचारी संस्था,अखिल भारतीय बंजारा परिषद, गोर सीकवाडी तसेच गोर सेना या संघटनेतर्फे मागणी करण्यात आली आहे यात मुख्य भूमिका राजकुमार जाधव नांदेड यांची असून सर्व संघटनांनी त्यांना सहकार्य करण्याचे व पाठिंबा देऊन हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक भारताचे रत्न यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी निवेदन देण्यात आले.

ते निवेदन आदरणीय लोकप्रिय जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिजीत राऊत साहेब यांनी स्वीकारले आणि भारताचे रत्न हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची प्रकाशित केलेली डायरी सुद्धा स्वीकारली आणि शिफारशी सह आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देत असताना अध्यक्ष राजकुमार जाधव, प्रसिद्धी प्रमुख अविनाश चव्हाण, जिल्हा सचिव युवराज जाधव, विधी सल्लागार ॲड .दिलीप राठोड,ॲड. संकेत राठोड,ॲड .पी.बिंदू नाईक, सहशिक्षक रंगनाथ राठोड,भारत चव्हाण, स.बापूराव राठोड,स. साहेबसिंग राठोड उपस्थित होते.
