नवीन नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रका प्रमाणे 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 याकालावधीत वाचन पंधरवाडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन ग्रंथाचे समीक्षात्मक वाचन ग्रंथालय स्वच्छता वाचक लेखक संवाद निबंध लेखन वाचनाचे महत्त्व व मला आवडलेले पुस्तक कथाकथन वाचन संवाद अशा प्रकारच्या विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्याल याच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दररोज ग्रंथालयात विविध पुस्तकांचे वाचन करून परीक्षण केले समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश घुले यांची उपस्थिती होती मार्गदर्शन पर भाषणामध्ये डॉ. घुले यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात पुस्तक वाचनाचे महत्त्व प्रतिपादन करताना इतर सामाजिक माध्यमास ज्ञान मिळवून न्याय संस्कृती जोपासून अव्यातपणे अभ्यास करावा असे मत मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.नरहरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहितीच्या मागे न लागता क्रमिक पुस्तका बरोबरच वर्तमानपत्रे, कादंबऱ्या ,ग्रंथ या साहित्याचे वाचन करून आपली प्रगती साधावी असे मत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक परीक्षण कार्यक्रमा मधे भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये प्रथम वैष्णवी कस्तुरे द्वितीय साक्षी नगराळे तृतीय स्नेहा काळे या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास मला आवडलेले पुस्तक ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन निवड स्पर्धा वाचन निवड स्पर्धा लेखक संवाद इत्यादी उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल सुनील राठोड यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.दिलीप काठोडे यांनी केले कार्यक्रमास प्राचार्य डॉ.डब्ल्यू .आर.मुजावर याचे मार्गदर्शन लाभले.

डॉ.मेघराज कपूरडेरिया,डॉ.निरंजन कोर सरदार, डॉ.मनीषा मांजरमकर, डॉ.पी. पी. लोखंडे, डॉ. रेड्डी विद्याधर ,डॉ.शेख डॉ. कर्डिले डॉ.बडगिरे डॉ.शिंदे डॉ. गोइनवाड डॉ. वरगन्टे,सहाय्यक ग्रंथपाल संतोष मोरे, ग्रंथालय सहाय्यक नरेंद्र राठोड, कनिष्ठ लिपिक राजेश्वर पाळेकर,कनिष्ठ लिपिक सुनिल कंधारकर, तेलंग गणेश ओ सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.