Vakan Sankalp ; समाजकार्य महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचा समारोप
नवीन नांदेड l महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रका प्रमाणे 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 याकालावधीत वाचन पंधरवाडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा म्हणून राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले ग्रंथ प्रदर्शन सामूहिक वाचन ग्रंथाचे समीक्षात्मक वाचन ग्रंथालय स्वच्छता वाचक लेखक संवाद निबंध लेखन वाचनाचे महत्त्व व मला आवडलेले पुस्तक कथाकथन वाचन संवाद अशा प्रकारच्या विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्याल याच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दररोज ग्रंथालयात विविध पुस्तकांचे वाचन करून परीक्षण केले समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश घुले यांची उप...
