नवीन नांदेड l बदलत्या काळानुसार माणूस बदलत चालला असून प्रत्येकाला शहरीकरणाची ओढ लागली आहे,परंतु ग्रामीण जीवनात जे गावपण, प्रेम,आपुलकी, स्नेह, जीवाला जीव लावणारी मसणुसकी आहे.

ते शहरात किंवा कुठे विकत मिळू शकत नाही म्हणजेच ग्रामीण जीवन सुंदर असून त्याची जपणूक करण्याची गरज असल्याचे मत नांदेड तालुक्याचे तहसीलदार संजय वरकड यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नीत श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नविन नांदेड यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शैक्षणिक वर्ष 24-25 विशेष वार्षिक शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी उदघाटनपर मार्गदर्शनात व्यक्त केले,यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ.डब्ल्यु. आर. मुजावर तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ.लक्ष्मीबाई बबनराव हंबर्डे, डॉ.रघुनाथ शेट्ये, ग्रामसेवक पेंडकर, डॉ,निरंजन कौर सरदार,डॉ.मनीषा मांजरमकर, मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे,पोलीस पाटील पांडुरंग हंबर्डे, तलाठी अंजुषा पवार, तलाठी राठोड यांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्राचार्य मुजावर यांनी विध्यार्थी हा समाजाचा केंद्र बिंदू असून केवळ शिक्षणातून समाज समजू शकत नाही तर प्रत्यक्षात सामाजिक जाणीवेतून समाजात समरस होऊन सामाजिक समस्या ओळखून त्यावर कसे मार्ग काढता येईल व त्यातूनच स्वतः चा व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमा धिकारी डॉ.दिलीप काठोडे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शिवाजी शिंदे व आभार डॉ.सत्वशीला वरघंटे यांनी मानले.

यावेळी सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वंयसेवक विद्यार्थी जवाहरलाल नेहरु समाज कार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको, नांदेड व प्रतिष्ठीत गुंडेगाव येथील गावकरी बांधव यांची विशेष उपस्थिती होती.