नांदेड| पोलीस स्टेशन माळाकोळी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेऊन (Nanded police revealed the accused) अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिल्यानंतर नांदेड पोलीसांनी 48 तासाच्या आत उघड केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी पोलीस स्टेशन माळाकोळी गु.र.न.15/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहीता सन 2023 मधील अल्पवयीन पीडीत मुलीचा शोध घेणेकामी 09 टीम तयार करुन तात्काळ अपहरीत मुलीचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप मॅडम, सपोनि संजय निलपत्रेवार य त्यांची टिम यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवुन गोपनीय माहीती काढुन पोलीस स्टेशन माळाकोळी येथील गु.र.न.15/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहीता सन 2023 मधील तपासात नेमण्यात आलेल्या 09 टिमसह विविध ठिकाणीची सि.सि.टी.व्ही चेक करुन व गोपनीय माहीती काढली.

सदर अल्पवयीन मुलगी ही आरोपी नामे शेषेराव गणपती गायकवाड यांचे राहते घरी मौ मोहोजा परांडा येथे असल्याचे माहीती मीळाली. त्या ठिकाणी जाऊन सदर मुलीचा शोध घेण्यात आल्याने सदर मुलगी मिळताच तिस तिच्या आई वडीलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आली आहे. तसेच आरोपी चंद्रकांन्त शेषेराव गायकवाड वय 38 वर्षे,शेषेराव गणपती गायकवाड वय 60 वर्षे, शोभाबाई शेषेराव गायकवाड वय 55 वर्षे तिघे राहणार मोहीजा परांडा ता कंधार जि नांदेड यांना पोलीस स्टेशन माळाकोळी येथे पुढील कार्यवाही कामी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील अधिक तपास मपोउपनि राणी व्यंकट भोंडवे मॅडम पोलीस स्टेशन माळाकोळी या करित आहेत. हि कार्यवाही अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड, डॉ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, डॉ. अश्विनी जगताप मॅडम उपविभाग कंधार यांचे मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा नांदेड, सपोनी संजय निलपत्रेवार पोलीस स्टेशन माळाकोळी, मपोउपनि राणी व्यंकट भोंडवे मॅडम पोलीस स्टेशन माळाकोळी यांनी केली आहे.
