हिमायतनगर| नांदेड – कामारी बस पिंपरी-विरसनी- टेंभूर्णी दिघी- घारापुर मार्गे हिमायतनगर मुक्कामी पाठविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत टेंभूर्णी पावनमारीचे सरपंच प्रल्हाद पाटील यांनी विभाग नियंत्रक मुख्य बस स्थानक, नांदेड व आगार प्रमुख हदगाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे मागील वर्षभरापासून निवेदन देऊन केली आहे. अगोदर या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. आता ये – जा करण्यासाठी रस्ता झाला, मात्र बसगाडी नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

हिमायतनगर तालुक्यातील टेम्भूर्णी पावनमारी गाव शासनाच्या अनेक सुविधेपासून वंचित आहे. या गावातील नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना शहराला ये- जा आकारण्याची मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नागरिकांच्या दळणवळणाची सोय व्हावी म्हणून नांदेड बस स्थानकाची बसगाडी हिमायतनगर येथे पाठवावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.

सदरील एस टी महामंडळ बसगाडी हि मुक्काम हिमायतनगर येथे झाल्यास कामारी पिंपरी-विरसनी टेंभूर्णी दिधी घारपुर गावातील जनतेस मोठा दिलासा मिळेल. तसेच हि बस सकाळी उलट मागीं हिमायतनगर घारपुर -दिघी-टेंभूर्णी- विरसनी- पिंपरी कामारी मार्गे नांदेड करण्यात यावी. यामुळे सदरील गावातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, कर्मचारी, महिला, जे व्यक्ती आरोग्य तपासणीसाठी गेलेले व त्यांचे नातेवाईक यांना लाभ मिळेल. अशी मागणी दिनांक 14 मार्च 2024 रोजी केली यास दहा महिने झाले मात्र अजूनही मागणी पूर्ण झाली नसल्याने पुन्हा दिनांक 22 जानेवारी रोजी पुन्हा निवेदन देऊन बस सोडण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

कामारी पिंपरी विरसणी-टेंभूर्णी दिघी घारापूर-हिमायतनगर हा मार्ग राज्य सदर पैकी कामारी पिपंरी-विरसणी रामा 259 हा रस्ता बस वाहतुकीस योग्य आहे. विरसर्णी टेंभूर्णी घरापूर-हिमायतनगर रामा 752 (1) असुन संपर्क महामार्ग विभागकडे आहे. असे पत्र उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिमायतनगर जि.नांदेड यांनी दिले आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळ बस सोडण्यात येऊन ग्रामस्थांची अडचण सोडण्यात यावी असे निवेदनात म्हंटलं आहे.
