किनवट, परमेश्वर पेशवे| भारतीय स्टेट बॅक शाखा गोकुंदाच्या शेजारी असलेले भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाची इ.पी.एस. कंपनीचे २१ लक्ष रुपये असलेले ए.टी.एम.मशीन दरोडेखोरांनी (looted the State Bank of India ATM ) पळवुन नेले. हि घटना दि. २२ जानेवारी रात्री १.५८ वाजण्याच्या सुमारास घडली असून किनवट पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाचे गोकुंदा शाखा शेजारी असलेले ए.टी.एम हे इलेक्ट्रोनिक पेमेंट सर्व्हीस प्रायवेट लिमिटेड या खाजगी एजंसी कडुन संचलित केले जाते. बुधवार २२ जानेवारीच्या मध्यरात्री १.५८ वाजता चोरट्यांनी मशीन मधील पैशासह दरोडा घातला असुन मुख्य रस्त्यावर व मेन चौकात रात्री बे रात्री वर्दळ असलेल्या भागातुन पैशासह मशीन चोरी गेल्याची खळबळ जनक घटना घडल्याने मोठी नामुष्की पोलिस प्रशासनावर ओढावली आहे.

तरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक धरणे, पोलिस निरिक्षक किनवट सुनिल बिर्ला, सहाय्यक पोलिस निरिक्षक सिंदखेड जाधवर, चोपडे, पोलिस उप निरिक्षक झाडे, येवले यांच्यासह पोलिस कर्मचारी तपास करत आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक धरने या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष देत असल्याने या प्रकरणाचा लवकर छडा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गोकुंदा येथिल ठाकरे चौक हे क्लासेस व हॉस्टेल या करिता बाहेर गावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या संचारामुळे व मुलींच्या होणा-या छेडछाडीच्या घटनांमुळे नेहमी चर्चेत राहते त्यात आता या घटणेची भर पडल्याने पोलिसां समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरोड्यामुळे सी.सी.टी.व्ही कॅमेराचा भ्रष्ट्राचार गोकुंदा ग्राम पंचायतचा उघडकीस आला असुन गोकुंदा ग्राम पंचायत ने लावलेले क़ॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने झालेल्या दरोड्याच्या घटनेला टिपता आलेले नाही. या प्रकरणी इलेक्ट्रोनिक पेमेंट सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड यांच्याकडुन किनवट पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती .
