नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस ठाणे अधिकारी (Himayatnagar police seized) कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील खडकी बा.येथे छापा मारून आरोपीतांकडून 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हज 460/- रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि.नांदेड यांना ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत हिमायतनगरमध्ये अवैध धंद्यांची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस अधिक्षक यांनी सदर अवैध धंद्यांवर वर कारवाई करणेबाबत श्रीमती शफकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांना एक विशेष पथक तयार करून कारवाई करणेकामी आदेशीत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.22 रोजी श्रीमती. शफकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर व पथक तसेच पोनि/अमोल भगत, हिमायतनगर व पथक असे पथक तयार करून छापा मारून खालीलप्रमाने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

खड़की बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड येथील राठोड यांच्या ढाब्यावरून विदेशी दारूच्या 87 बॉटल्स, कि. अं. 13,920/- रु. व रोख रक्कम 12,150/-रु. अशी एकूण 26,070/- रु. किंमतीची मालमता मिळून आल्याने गु.र.क्र. 13/25, कलम 65 (ई) म.दा.अ.1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेख जिलानी खंडकी बाजार याचे रहाते घरी देशी दारूच्या 28 बॉटल्स, कि.अं.1,960/- रु., विदेशी दारूच्या 12 बॉटल्स कि.अं. 1,920/- रु. तसेच 02 तलवार व 01 खंबर मिळून आल्याने गु.र.क्र.14/25, कलम 65 (ई) म.दा.अ.1949 सह 4,25 भाहका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच बरोबर तानाजी सोळंकी खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड याचे टिन पत्र्याचे शेडमध्ये देशी दारूच्या 93 बॉटल्स, कि. अं.6,510/- रु. मिळून आल्याने गु.र.क्र.15/25, कलम कलम 65 (ई) म.दा. अ. 1949 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नमुद गुन्ह्यात एकूण 36 हजार 460/- रुपयाची मालमत्ता, 02 तलवार व 01 खंजर हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केली असून वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांची माहिती मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या 8802007938 या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात यावी, अवैध धंद्याची माहिती देणा-या व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.

हि कार्यवाही अविनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्रीमती. शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली,अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे, HC/2565, बंकट, HC/2529, कदम, NPC/2608, मकसूद, PC/2624, बुलबुले, HC/1229, आहे, HC/161, सोनपारखे, DPC/105, हनवते, HC/1692, गुंडेवार, PC/3128, तेलंग, PC/3231, पिंगलवाड, ASI/साखरे, ASI/बापव, HC/1966, आउलवार, यांनी केली आहे.