हिमायतनगर| सिटु व लोक विकास संघर्ष समितीच्या वतिने हिमायतनगर येथील प्रलंबीत मागण्यासाठी व आपण दिलेल्या लेखी आश्ववासनाची त्वरीत अंमलबजावनी करण्याच्या मागणीसाठी दि. २३ जानेवारी २०२५ पासून नगरपंचायत हिमायतनगर समोर बेमुदत धरणे आंदोलन (On behalf of SITU and Public Development Coordination Sangharsh Committee) सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला व पुरुष नागरिकांचा सभाग आहे.

हिमायतनगर शहरात मागील ७० वर्षा पासून आनेक नागरिकांचे वास्तव्य व रहिवास असून रहतो ते घर नावावर करावे व नमुना नं. ४३ (अ) मालकी हक्क प्रमाण पत्र देण्यात यावे. तसेच घरलकुल बांधण्यासाठी रूपये ५ लाख रूपयाची प्रत्येकी तरतूद करावी, ह्या प्रमुख मागण्या व हिमायतनगर येथील रहिवास असलेल्या सर्व अर्जदारांना (नमुना नं.४३) मालकी हक्क प्रमाण पत्र देवून घरकुलसाठी ५ लाख रूपये मंजुर करावेत. नगर पंचायत हिमायतनगर येथील कंत्राटी सफाई कामगार यांचे हजेरी पुस्तक तयार करणे. बँकेतून पगार देणे, पी. एफ भरणे व आठवडी एक सुट्टी देणे. मुख्याधिकारी नगर पंचायत हिमायतनगर यांनी लेखी पत्र दिले आहे. त्याची त्वरत आमलबजावनी करावी. सफाई (कंत्राटी) कामगाराचे थकित वेतन फरकासह देणे व किमान वेतन कायद्याची अंमलबजावनी करावी. मनरेगा अंतर्गत शहरात व तालुक्यात राजगार हमेची कामे उपलब्ध करा व नियमित जॉब कार्ड वाटप करा तसेच ज्यांना काम दिले नाही त्यांना बेकारी भत्ता द्या.

शेती क्षेत्रात पेरणी ते कापनी रोहयो अंतर्गत करून द्यावीत व मनरेगा मध्ये समाविष्ट करावे. नगर पंचायत अंतर्गत महिलाचे आर्थिक व सामाजिक स्तर उचावण्या साठी महिला बचत गट निर्माण करून शासकीय योजनाचा लाभ देण्याचे नं. पं कडुन लेखी पत्र दिले त्यांची आमलबजावनी करा. वृध्द भुमिहीन, दिव्याग व निराधार यांचे मानधन वाढवून रूपये २१०० रू करा (जाचक अटी रद करा.) व नियमीत आनुदान बैंक खात्यात जमा करा. हिमायतनगर येथील जल जीवन योजने मार्फत पाणी पुरवठा योजनेत मोठा भष्ट्राचार झाला मागील सहा वर्षा पासून काम अर्धवट व शासकीय आधिकारी व कंत्राटीदाराचे उखळ पाढरे झाले. कारण १९ कोटी रूपये येवून योजनेचा बोजवारा उडाला आहे. योजनेची चौकशी करा व दोषी वर कडक कार्यवाही करा. स्वच्छ पाणी हर घर मिळेल याची काळजी घ्या.

हिमायतनगर येथील बेरोजगाराना काम देण्यासाठी एम आय डी. सी. ची निर्मिती करा असे आश्वासन आमदार साहेबांनी मतदाना पुर्वी दिलेले वचन त्वरीत पुर्ण करावे. अल्प भुधारक शेतकऱ्याचे व पांढरे रेशन कार्ड धारकाचे बंद केलेले धान्य त्वरीत चालु करा जिल्हाधिकारी यांचे दि. १८/१२/२०२४ व २३/१२/२०२४ लेखी पत्राची आमलबजावनी करावी. अश्या विविध मागण्या या बेमुदत धरणे आंदोलनातून करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या प्रति तहसीलदार साहेब तहसील कार्यालय हिमायतनगर, पोलीस निरिक्षक साहेब हिमायतगनर यांना देण्यात आल्या असून, यावर कॉ. दिगांबर काळे (अध्यक्ष लो.वि.स.स. हि.सं.स),(सचिव. सी. आय. टी. यु.), जयश्रीबाई बिजेवार (ता. उपाध्यक्ष लो.वि.स.स.हि.सं.स), गणेश रच्चेवार (सचिव. सी. आय. टी. यु.), कांताबाई बनसोडे (अध्यक्ष म.न.प.यु.सि.टु.), नविन मादसवार, परमेश्वर सुर्यवंशी, वैशाली जलेवार, गंगाधर गायके, धुरपतबाई तुंगेवाड, रेणुकाबाई माने आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
