On behalf of SITU and Public Development Coordination Sangharsh Committee : सिटु व लोकविकास समन्वय संघर्ष समितीच्या वतीने हिमायतनगर नगरपंचायतीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु
हिमायतनगर| सिटु व लोक विकास संघर्ष समितीच्या वतिने हिमायतनगर येथील प्रलंबीत मागण्यासाठी व आपण दिलेल्या लेखी आश्ववासनाची त्वरीत अंमलबजावनी करण्याच्या मागणीसाठी दि. २३ जानेवारी २०२५ पासून नगरपंचायत हिमायतनगर समोर बेमुदत धरणे आंदोलन (On behalf of SITU and Public Development Coordination Sangharsh Committee) सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात महिला व पुरुष नागरिकांचा सभाग आहे.
हिमायतनगर शहरात मागील ७० वर्षा पासून आनेक नागरिकांचे वास्तव्य व रहिवास असून रहतो ते घर नावावर करावे व नमुना नं. ४३ (अ) मालकी हक्क प्रमाण पत्र देण्यात यावे. तसेच घरलकुल बांधण्यासाठी रूपये ५ लाख रूपयाची प्रत्येकी तरतूद करावी, ह्या प्रमुख मागण्या व हिमायतनगर येथील रहिवास असलेल्या सर्व अर्जदारांना (नमुना नं.४३) मालकी हक्क प्रमाण पत्र देवून घरकुलसाठी ५ लाख रूपये मंजुर करावेत. नगर पंचायत हिमायतनगर येथील कंत्राटी सफाई कामगार ...
