Send ST Bus : नांदेड – कामारी बस पिंपरी-विरसनी- टेंभूर्णी दिघी- घारापुर मार्गे हिमायतनगर मुक्कामी पाठवा
हिमायतनगर| नांदेड - कामारी बस पिंपरी-विरसनी- टेंभूर्णी दिघी- घारापुर मार्गे हिमायतनगर मुक्कामी पाठविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत टेंभूर्णी पावनमारीचे सरपंच प्रल्हाद पाटील यांनी विभाग नियंत्रक मुख्य बस स्थानक, नांदेड व आगार प्रमुख हदगाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे मागील वर्षभरापासून निवेदन देऊन केली आहे. अगोदर या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. आता ये - जा करण्यासाठी रस्ता झाला, मात्र बसगाडी नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
हिमायतनगर तालुक्यातील टेम्भूर्णी पावनमारी गाव शासनाच्या अनेक सुविधेपासून वंचित आहे. या गावातील नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना शहराला ये- जा आकारण्याची मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नागरिकांच्या दळणवळणाची सोय व्हावी म्हणून नांदेड बस स्थानकाची बसगाडी हिमायतनगर येथे पाठवावी अशी...
