HomeनांदेडVehicls himayatnagar police station ; हिमायतनगर ठाण्यातील जमा वाहने संबंधीतांनी कागदपत्राची पूर्तता...

Vehicls himayatnagar police station ; हिमायतनगर ठाण्यातील जमा वाहने संबंधीतांनी कागदपत्राची पूर्तता करून घेऊन जावी – पोलिस निरीक्षक अमोल भगत

हिमायतनगर। येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजीक असलेल्या पोलीस ठाण्यात मागील अनेक महिन्यांपासून जमा असलेली वाहने कागदपत्र, पुरावे सादर करून घेऊन जावी. असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले आहे. अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाईल असेही त्यांनी म्हंटले आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या परिसरात झालेल्या अपघातातील आणि काही ठिकाणी बेवारस स्थितीत आढळून आलेली चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहने पोलीस स्थानकात जमा करण्यात आली आहेत. सदर वाहने अनेक महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात आहेत. याबाबत अनेकदा सूचना देऊन आपली वाहने घेऊन नेण्यात असमर्थता दर्शविली आहे.

त्यामुळे येथील वाहने ज्यांची कुणाची आहेत त्यांनी आपल्या गाडीचे कागदपत्रे व इतर पुरावे सादर करून घेऊन जावीत. अन्यथा येत्या तीन दिवसात या वाहनाचा कायदेशीर लिलाव प्रक्रिया करण्यात येईल. आणि त्यानंतर वाहनांची जबाबदारी ज्यांची त्यांच्यावर राहील असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments