हिमायतनगर। तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट दोन की,तिन या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकां घ्या असे आदेश राज्यशासनाला केले असल्याने जि.प. व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या चर्चेने वेग धरला आहे. तसेचं नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक ही यासोबतच होणार असल्याने पुढारी आता आगामी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.


हिमायतनगर तालुक्यात पुर्वी जिल्हा परिषदेचे कामारी, सरसम, व हिमायतनगर असे तिन गट होते. हिमायतनगर नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर या ठिकाणचा जिल्हा परीषेदेचा हिमायतनगर गट कमी झाला. आपसुकच पंचायत समितीचे दोन गण कमी झाले. सध्याला कामारी, दुधड, सरसम, सिरंजनी असे चार गण आहेत. तत्कालीन आघाडी शासनाने पुर्वी प्रमाणे जिल्हा परिषदेचे तिन गट पंचायत समितीचे सहा गण असा नियम लागू केला.

परंतू सत्ता परिवर्तनाऩंतर महा युती सरकारने आघाडी सरकारचा निर्णय रद्द करून दोनच गट कायम केले. त्यानंतर आता मधल्या काळात निवडणूकीचा बिगूल वाजणार अशी चर्चा सुरू झाली. परंतु मधल्या काळात त्यावर इरजन पडले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले असून चार महिन्यांत निवडणूका घ्या असे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या चर्चेची राळ उठली आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चर्चा रंगू लागली आहे.इच्छूकांनी आपला मोर्चा मतदारांच्या दाराकडे वळवीला आहे. तसेच स्थानिक नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक आप आपल्या वार्डात मोर्चेबांधणी करीत आहेत. तालुक्यांतील तिन जिल्हा परिषदेच्या गटाची निर्मीती कायम ठेवले तर कामारी, दुधड, सरसम हे गट राहणार आहेत.
