हिमायतनगर। इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळेची विद्यार्थिनी कु. क्षमा देबडवार या विद्यार्थ्यांनीने ९६.२०% गुण प्राप्त करून तालूक्यातून प्रथम येण्याचा बहूमान मिळवीला आहे. तर राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.वैष्णवी रायेवार हिने ९५.६० % गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळविला आहे.


हिमायतनगर तालुक्यात १ हजार १०९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यांपैकी ९७३ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. ९१.६६% जिल्हा परिषद हायस्कूल चा या वर्षी अप्रतिम राहीला आहे. तर राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ९६.९७ % , हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा ९२.४२%, माध्यमिक विद्यालय ५९.०९%, जिल्हा परिषद हायस्कूल जवळगांव ९८.२६%, जिल्हा परिषद हायस्कूल कामारी ९८.११ %, राजा भगीरथ विद्यालय धानोरा ८६.८४%, महादजी पाटील विद्यालय कांडली ९१.३०%,

कै. श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम ८१.२५%, शासकीय आश्रमशाळा दुधड ९८.३६%, हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय खडकी ९३.७८%, शासकीय आश्रमशाळा एकघरी १००%, शेषराव चांदराव राऊत महादापूर ८३.३३%, मनिषा आश्रमशाळा पोटा ९३.१०%, परमेश्वर माध्यमिक विद्यालय विरसणी ९८.६३%, हाजी आदमजी उर्दू शाळा हिमायतनगर ८९.२८%, मातोश्री शेखावत आश्रमशाळा ६६.६६%, गुरुकूल इंग्लिश स्कूल हिमायतनगर २५%, असे एकूण १७ शाळेचा निकाल लागला आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी कौतुक करुण पुढील शिक्षणासाठी सुभेच्छा दिल्या आहेत.
