Police Inspector Amol Bhagat : गोवंशाची कत्तल केल्यास दोषींवर कडक कार्यवाही करणार – पोलीस निरीक्षक अमोल भगत
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्यात प्राणी संरक्षण गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. या कायद्याची काटकोर अंमलबजावणी करण्यासाठी कुणीही गोवंशाची कत्तल आणि कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक, निर्यात करून कायदयाचे उल्लंघन करू नये. या सूचना केवळ उत्सवा पुरत्या नाहीत तर कायमसाठी आहेत. जर कुणी कायद्याचे उल्लंघन करून गोवंशाची कत्तल अथवा अवैध वाहतूक करत असले तर संबंधित व त्यांना सहकार्य करणाऱ्या दोषींवर कडक कार्यवाही केली जाईल असा कडक इशारा पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी दिला.
ते हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक ०३ जून रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीची बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना करताना बोलत होते. यावेळी पुढे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी सांगितले कि, बकरी ईद निमित्त गोवंश जातीचे जनावरे वाहतुक व कत्तलीसाठी विना अन्नपाणी क्रूरतेन...




