हिमायतनगर, अनिल मादसवार। पत्रकार आणि पोलीस एका गाडीची दोन चाके आहेत, दोघांमध्ये समन्वय असल्याने सर्वसामान्य जनतेच्या चांगल्या कामाला व खाऱ्याला न्याय देणे सोयीचे होते. त्यासाठी पत्रकारांनी बातमी लिहीत असताना, घटनेची सत्यता तपासून बातमी प्रकाशित करावी. असे मत पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी व्यक्त केले.

हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात दि. ४ मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता पोलीस व पत्रकार स्नेह मिलन व चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक भगत बोलत होते. पुढे बोलतांना भगत म्हणाले की, पत्रकारांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असतांना, गुन्हेगारांविषयी काही माहीती असल्यास आपण गोपनीय पद्धतीने गुन्हेगारां संबंधीची माहीती पोलीसांना द्यावी. आपले नांव गोपनीय ठेवल्या जाईल.

पत्रकारांनी कोणतीही बातमी लिहीत असताना, घटनेची सत्यता व दोन्ही बाजूंनी शहानिशा करूनच बातमी प्रकाशित करावी. जेणेकरून त्या बातमीमुळे वातावरण दुषित होणार नाही. याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी, म्हणून आपण सर्व पत्रकार बांधवानी बातमीची सत्यता पडताळूनच बातमी प्रकाशित केलेले समाजाच्या हिताचे होईल. त्यामुळे पत्रकार व पोलीस मिळून एक चांगला संदेश जनतेत पोहोचविण्याचे काम साध्य होईल. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण सर्वानीच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे अवाहन ही या प्रसंगी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले. यावेळी शहर व ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
