नांदेड। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे अभिजीत राऊत यांची शासनाने बदली झाली आहे. तर नांदेडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून मुंबई सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी आपल्या अडिच वर्षाच्या कार्यकाळात प्रशासकीय कामाकाजाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नुकतीच त्यांची बदली करण्यात आली असून, नांदेड येथे नवे जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी काढले आहेत.

आत्तापर्यंत नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, तानाजी सत्रे, राधेश्याम मोपलवार, धीरजकुमार, अरुण डोंगरे, डॉ. विपिन इटनकर यांनी काम पाहिल आहे. यातील राधेश्याम मोपलवार यांनी २००८ साली झालेला गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा यशस्वी केला तर डॉ. श्रीकर परदेशी यांनी राज्याला कॉपीमुक्त पॅटर्न दिला. यासह अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले.

जिल्हाधिकारी म्हणून अभिजीत राऊत यांनी अडिच वर्षापूर्वी नांदेडचा पदभार घेतला. राऊत यांची पूर्वीपासूनच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. अवघ्या काही दिवसांतच जिल्हा प्रशासनाच्या कामकाजास त लावले. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनाही त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात राज्य स्तरावरील महासांस्कृतिक महोत्सव नांदेडात पार पडला. या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. त्याचवरोवर तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वी केला. यात लाडक्या बहिणीचा मेळावाही यशस्वीरित्या

आयोजनात राऊत यांची भूमिका मोलाची आणि उल्लेखनीय ठरली. तर नांदेड शहरवासीयांना सांस्कृतिक कलेची मेजवानी मिळावी यासाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. या प्रशासकीय तथा सांस्कृतिक उपक्रमांसोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता विकासाच्या हिताचे निर्णय घेतले. यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लागली. सोबतच शासनाने वाळू वितरणाचे धोरण जाहीर केल्यानंतर त्याचीही चोख अंमलबजावणी केली. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाळू तस्करांवर घडक कारवाई केली. अशा या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची अखेर बदली झाली असून, संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर विभागाचे सहआयुक्त म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. तर नांदेड येथे नवे जिल्हाधिकारी म्हणून नवी मुंबई येथील सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची शासनाने नियुक्ती केली असल्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाने दि.४ फेब्रुवारी रोजी सार्यकाळी काढले.