श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| हिंदू क्रांतीसूर्य विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची ४८५ वि जयंती गुरुवार दिनाक २९ मे रोजी महाराणा प्रतापसिंह चौक येथे साजरी करण्यात आली. आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.या वेळी शहरातून भव्य मिरवणुक (शोभायात्रा) काढण्यात आली .


विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त भव्य मिरवणुकिचे आयोजन महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक उत्सव समिती कडून करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाने यावर्षीही ( तिथी नुसार ) महाराणा प्रताप यांची ४८५ जयंती साजरी करण्यात आली. विरशिरोमनी महाराणा प्रताप चौक प्रभाग क्र.५ येथे सकाळी ११ वा प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात येऊन सायंकाळी ५ वाजता नगरसेवक गोपु महामुने.निळकंठ मस्के, बजरंगसिंह हजारी,विजय आमले, संतोष दूबे,नयनसिंह राठौर.सुमेरसिंह ठाकुर. राजाराम गंदेवाड, राजकुमार भोपी ई. मान्यवराच्या हस्ते शोभायात्रा प्रतीमेचे पूजन करण्यात आले, शहरातून ढोल ताशाच्या गजरात. फटाके आतिशबाजीत भव्य मिरवणुक मार्गान शोभायात्रा काढण्यात आली.

उत्सव समितिचे अध्यक्ष विजयसिंह हजारी व राजपूत क्षत्रिय समाज संघटना माहूर तालुका अध्यक्ष पवनसिंह चौव्हाण यांनी समिती ला सोबत घेऊन मिरवणूक शांततेत पार पाडली.या मिरवणुकीत विविध समाजातील विविध पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी समाज बाधव यांच्या सह सर्व धर्मिय प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मिरवणूक दरम्यान सपोनी शिवप्रकाश मुळे,सपोउपोनी संदिप अंनेबोईनवाड,पालसिंंग ब्राह्मण,गजानन चौधरी, गजानन जाधव, व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला
