Maharana Pratap Singh Jayanti : माहुर येथे महाराणा प्रतापसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| हिंदू क्रांतीसूर्य विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांची ४८५ वि जयंती गुरुवार दिनाक २९ मे रोजी महाराणा प्रतापसिंह चौक येथे साजरी करण्यात आली. आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.या वेळी शहरातून भव्य मिरवणुक (शोभायात्रा) काढण्यात आली .
विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त भव्य मिरवणुकिचे आयोजन महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक उत्सव समिती कडून करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाने यावर्षीही ( तिथी नुसार ) महाराणा प्रताप यांची ४८५ जयंती साजरी करण्यात आली. विरशिरोमनी महाराणा प्रताप चौक प्रभाग क्र.५ येथे सकाळी ११ वा प्रतिमा पुजन व अभिवादन करण्यात येऊन सायंकाळी ५ वाजता नगरसेवक गोपु महामुने.निळकंठ मस्के, बजरंगसिंह हजारी,विजय आमले, संतोष दूबे,नयनसिंह राठौर.सुमेरसिंह ठाकुर. राजाराम गंदेवाड, ...

