नांदेड| जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे पावसाळ्यात होणारे कीटकजन्य आजार व जलजन्य आजार या विषयावर बैठक घेण्यात आली.
पावसाळा सुरू झाला की, पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते तसेच पावसाळ्यामध्ये कीटकजन्य आजारही होतात.


पावसाळ्यात कावीळ, गॅस्ट्रो, लेटेस्ट पायरोसिस, डिसेंट्री, डायरिया तर डेंगू चिकनगुनिया, मलेरिया, झिका असे कीटकजन्य आजारही होतात. त्याच बरोबर लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, पोटाची समस्या जाणवण्याची शक्यता असते. या आजारामध्ये लघवी पिवळी होणे, भूक न लागणे, अशक्तपणा उलटी, जुलाब, ताप कळ मारून, अतिसार, तीव्र सतत डोके व पोट दुखी, नाक, तोंडाने हिरड्यातून रक्त येणे त्वचेवर पुरळ येणे आणि अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे असे लक्षणे दिसून येतात.

पावसाळ्याच्या दिवसात डासांचा प्रादुर्भाव वाढतो डासापासून संरक्षण न झाल्यास डेंगू सारखे आजार डोकेवर काढू शकतात तसेच जलजन्य आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी शुद्ध असायला आहे लहान मुलांना पिण्यासाठी पाणी देताना उकळून थंड करून द्यावे. त्यामुळे जलजन्य आजाराचा धोका कमी होतो. तसेच मुलांना रस्त्यावरील हॉटेलचे अन्नपदार्थ खाण्यासाठी देऊ नये त्यापासून पोट बिघडण्याची दाट शक्यता असते. देशात पाच वर्षापर्यंत बालकांच्या मृत्यूमध्ये अतिसार हे प्रमुख कारण असून दहा टक्के बालके अतिसरामुळे दगावतात अर्भक मृत्यू व बालमृत्यू कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

पावसाळ्यात लहान मुलांसाठी जास्त जागरूक राहायला हवे मुलांना सकस आहार शुद्ध पाणी पिण्यासाठी द्यावे.तसेच बाहेरचे पदार्थन न देता घरचे ताजे पदार्थ द्यावे.अंगावर पूर्ण कपडे घालावेत स्वच्छतेला महत्व देणे गरजेचे आहे. असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहेत.

काय काळजी घ्याल
आहार – मुलांना हॉटेल किंवा रस्त्यावरील उघड्यावरील तयार करण्यात येणारे पदार्थ खाण्यास देऊ नये
शुद्ध पाणी – लहान मुलांना पिण्याचे पाणी उकळून थंड करून द्यावे पाण्यात सहसा बदल करू नये
स्वच्छता – पावसाळ्याच्या दिवसात स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.ओले कपडे घालू नयेत शरीर स्वच्छ व कोरडे ठेवावे शुद्ध पाणी सकस आहार द्यावा बाहेरचे पदार्थ देण्याचे टाळावे.
काय खबरदारी घ्यावी
खबरदारी घेतल्यास कीटकजन्य आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. आजारापासून बचाव करण्यासाठी घरांच्या खिडक्यांना जाळ्या बसव्यात झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा कोरडा दिवस पाळावा, पाण्याचे साठे साचू देऊ नये ताप आल्यास अंगावर न काढता तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. सभेला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अमृत चव्हाण, सौ रेणुका दराडे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, संजय भोसले जिल्हा आरोग्य पर्यवेक्षक, सतीश शिंदे, विलास नाईक, राजू शेट्टे, वैभव कौसल्ये, वाघमारे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, माधव कोल्हे, सत्यजीत टिप्रेसवार, व्यकटेश पुलकंठवार आरोग्य निरीक्षक, जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य निरीक्षक (हिवताप, हत्तीरोग) उपस्थित होते.