Saturday, May 16

मराठवाडा

And then there is the most dangerous risk of all — the risk of spending your life not doing what you want on the bet you can buy yourself the freedom to do it later.

Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL

Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL

नांदेड, मराठवाडा
उदगीर। वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांची उदगीरची टीमने भेट देऊन निमंत्रण दिले आहे.  सर्वश्री सचिन शिवशेट्टे (विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद), बिभीशन मद्देवाड अध्यक्ष रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान, श्रीनिवास सोनी अध्यक्ष उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद,अर्जुन जाधव हल्ला विरोधी कृती समितीचे उदगीर तालुका समन्वयक,सुनील हवा सचिव उदगीर तालुका मराठी पत्रकार परिषद, सिद्धार्थ सुर्यवंशी सचिव मराठी पत्रकार संघ उदगीर या सर्वांनी आज वडवणी मध्ये भेट घेऊन उदगीर येथे होत असलेल्या 20 ऑक्टोंबर 2024 रोजी पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य सम्मेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आले. श्री.एस.एम.देशमुख सर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारल्या बद्दल त्यांचे व डिजिटल मिडिया परिषदेचे नव...
Collector : शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी -NNL

Collector : शासकीय जमिनीवर बेकायदेशीर ताबा दाखवाल तर गंभीर कारवाई करू : जिल्हाधिकारी -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शासकीय अर्थात सरकारी जमिनीची बनावट खरेदी विक्री करून गैरव्यवहार केल्याचे काही ठिकाणी पुढे येत आहे.अशा प्रकारे गैरव्यवहार सहन केले जाणार नाही. नांदेड जिल्ह्यात अशा शासकीय जमिनीची यादी सर्व संबंधित कार्यालयात दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सातबारा अधिकार अभिलेखात महाराष्ट्र शासनाच्या नावे नोंद असलेल्या शासकीय जमिनी, गायरान जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. खोटे कागदपत्र तयार करून ग्रामपंचायतच्या नमुना नंबर आठ अ ला बेकायदेशीर नोंद होत असल्याच्याही काही तक्रारी आहेत. तालुका व जिल्हा कार्यालयात अशा तक्रारी येत असल्याने त्याची गंभीर नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली आहे. काही प्रकरणात तपास करण्याचे आदेशही देण्य...
Shekharji Mundada : उत्पादन बनविणाऱ्या कंपनीसोबत गोसेवा आयोग करार करणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आ. म. राज्य)  -NNL

Shekharji Mundada : उत्पादन बनविणाऱ्या कंपनीसोबत गोसेवा आयोग करार करणार – शेखरजी मुंदडा, अध्यक्ष गोसेवा आ. म. राज्य) -NNL

नांदेड, मराठवाडा, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे| भारतीय गोवंशाला महाराष्ट्र शासनाने नुकतेच "राज्य माता-गोमाता" असा दर्जा दिला असून भारतीय गोवंशाच्या परिपोषणाकरिता रुपये 50 प्रति दिन प्रति गोवंश अनुदान घोषित केले आहे या दोन्ही प्रस्तावांचा पाठपुरावा गोसेवा आयोगाने केला आहे. तसेच भविष्यात गोशाळा स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने शेण व गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील गोशाळांना तांत्रिक व आर्थिक मदत देऊन तयार केलेली उत्पादने गोसेवा आयोगामार्फत विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे पोखरभोसी ता.लोहा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.नुकताच गोवंश निवारा व चारा गोदाम उभारणीसाठी कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शेखरजी मुंदडा हे होते. तर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंड...
Marathwada Mukti Sangram Jagar : मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा नांदेड येथील महात्मा गांधी पुतळा समोर समारोप -NNL

Marathwada Mukti Sangram Jagar : मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा नांदेड येथील महात्मा गांधी पुतळा समोर समारोप -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड। राज्य मराठी पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड.यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रमाचा समारोप नांदेड येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी विचारमंच आणि राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोंबर 2024 हा मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील समाधी स्थळापासून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी निवृत्त सैनिक संतोष लोखंडे यांचा महात्मा गांधी पुतळ्यासमोर सन्मान करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ऍड.धोंडीबाराव पवार, डॉ. शिवदास हमंद, ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, राजकुमार ब...
Shamal Kurundkar : फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही.- शामल कुरुंदकर -NNL

Shamal Kurundkar : फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही.- शामल कुरुंदकर -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड, गोविंद मुंडकर| आम्हाला फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही. असे प्रतिपादन नरहर कुरुंदकर यांच्या कन्या शामल कुरुंदकर यांनी केले. ते सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी एक वाजता राज्य मराठी पत्रकार परिषद आणि स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमात नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम जागर उपक्रम कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नाशिक येथील नंदन राहणे ,डॉ. शिवदास हमंद, गोविंद मुंडकर, दीपनाथ पत्की, राजकुमार बिर्ला, डॉ. अनिल शिरसाठ, प्रदीप जैन, नीरज अवस्थी यांची उपस्थिती होती. शामल पत्की पुढे म्हणाल्या की, , मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी अहोरात्र झटले असे ज्ञात आणि अज्ञात हुतात्म्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आणि गरजेचे आहे. उपेक्षित चळवळ...
Ranphul Phulwinone Child Poem : ‘रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत’ या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न -NNL

Ranphul Phulwinone Child Poem : ‘रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत’ या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय येवती येथील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि उपक्रमशील शिक्षक संतोष तळेगावे यांनी संपादित केलेल्या 'रानफुलं फुलविणारे बालकवी : डॉ.सुरेश सावंत' ह्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच येवती (ता. मुखेड) येथे मोठ्या थाटात संपन्न झाले. श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी सुभेदार हे होते. ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी आंबुलगेकर यांच्या हस्ते, ख्यातनाम बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत, इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे, मुखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, विजयकुमार चित्तरवाड, मुखेड मायबोली मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश पवार, ज्ञानोबा जोगदंड, गोविंद कवळे, एकनाथ डुमणे, सुरेश पाटील, मारोती कंतेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. प्रकाशक दत्ता डांगे यांनी रसग्रहण लिहिलेल्या विद्यार्थ्यांना मानधन ...
Participation of 50 children : “वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग -NNL

Participation of 50 children : “वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात आज 18 सप्टेंबरला झाली. नवी दिल्ली येथून झालेल्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील 50 बालकांनी सहभाग घेतला त्यापैकी दहा बालकांना कायम निवृत्ती वेतन कार्ड देण्यात आले. नांदेड जिल्ह्याचा 50 बालकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संबोधन ऐकायला मिळाले.हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात ऑनलाईन घेण्यास आला. नांदेड जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक कालिदासू पक्काला, सहमहाव्यवस्थापक यु. सुरेश बाबू, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राम शृंगारे...
भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने दामोदर मावजोना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा – देविदास फुलारी यांची मागणी -NNL

भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने दामोदर मावजोना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा – देविदास फुलारी यांची मागणी -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड। ज्ञानपीठ हा अतिशय सन्मानाचा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असून, तो भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे दिला जातो. इ. स. 1944 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती साहू शांतीप्रसाद जैन यांनी या संस्थेची स्थापना केली. भारतीय भाषांमध्ये अनन्यसाधारण निर्मिती करणाऱ्या लेखकास व त्याच्या एकूणच साहित्यिक कर्तुत्वास हा पुरस्कार दिला जातो. भाषेच्या संदर्भात ज्या लेखकाची अभिवृत्ती औदार्याची आहे. अशाच लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. पण अलीकडे गोव्यातील जेष्ठ कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी गोव्यातील राजभाषा कायद्यात मराठी भाषा नको असे विधान करून भाषावाद तर निर्माण केलाच आहे शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भाषा विकृतीही दाखवून दिली आहे. मावजो हे अतिशय दांभिक लेखक असून उदगीर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी मराठी प्रेम बोलून दाखवले होते पण ते प्रेम पुतना मावशीचे ठरले. चांगला लेख...
Manpa CIDCO Vasrani ; मनपा सिडको वसरणी भागातील नावघाट पुल वाहतूक बंद -NNL

Manpa CIDCO Vasrani ; मनपा सिडको वसरणी भागातील नावघाट पुल वाहतूक बंद -NNL

नांदेड, मराठवाडा
नवीन नांदेड। नांदेड जिल्ह्यातील संततधार पावसाच्या नंतर विष्णुपूरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून आकरा दरवाजा ऊघडण्यात आल्याने जुन्या नांदेड मधील जोडणारा मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेला नावघाट पुलावरून पाणी वाहत असल्याने २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मनपा व जिल्हा प्रशासनाने दुतर्फा वाहतूकीसाठी बंद केला असून मोठया प्रमाणात पुर पाहण्यासाठी गर्दी केली होती, नदीकाठी असलेल्या मुझामपेठ भागातील काही कुटुंबे तात्पुरते शाळेत स्थालंतरीत केली असून मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे व तलाठी सोनटक्के हे घटनास्थळी असून ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नांदेड जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे विष्णपुरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होत असल्याने ११ आकरा दरवाजे उघडले असून २ सप्टेंबर रोजी मोठया प्रमाणात काठोकाठ पाण्य...
Waterfall ; मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंडचा मनमोहक धबधबा -NNL

Waterfall ; मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंडचा मनमोहक धबधबा -NNL

नांदेड, मराठवाडा
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर पैनगंगा नदी वरील सहस्त्रकुंडचा मनमोहक धबधब्याच्या सर्व धारा भरुन वाहत आहे छायचित्रकार विजय होकर्णे यांनी टीपलेले छायाचित्र व याबाबत दिलेली माहिती वाचकांसाठी देत आहेत..... किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड (इस्लापूर) येथे असलेला अन् शेकडो वर्षापासून जनतेच्या मनाचा ठाव घेणारा प्रचंड धबधबा म्हणजे सहस्त्रकुंडचा धबधबा, सतत पर्यटकांसाठी आकर्षक असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर इस्लापूर गावापासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर आहे. या धबधब्याचे पाणी साठण्यासाठी एक खोल कुंड असून आज पर्यंत या कुंडाच्या खोलीचा तळाचा अंदाज लागलेला नाही. विकासाच्या दृष्टिने अजूनही दुर्लक्षीतच आहे. येथे महादेवाचे मंदिर असुन पंचकोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मला ध्वनी आणि पाण्याची जोरदार शक्ती आवडते, मग त्या समुद्राच्या लाटा असो किंवा धबधबा त्यातल्या त्यात लाटांची अनुभुती घ्यायची अस...
error: Content is protected !!