Homeनांदेडविद्यार्थ्यांनी किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा – कुलगुरू...

विद्यार्थ्यांनी किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार Master of Social Work (MSW), Bachelor of Social Work (BSW) व Bachelor of Computer Application (BCA) प्रथम वर्षात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रामध्ये Master of Social Work (MSW), Bachlor of Social Work (BSW) व Bachaller of Computer Application (BCA) या अभ्यासक्रमाचे पदवी व पदव्यूत्तर शिक्षण सुरु झाले आहे. किनवट, माहूर परीसरातील विद्यार्थ्यांना सदरील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी नांदेड, संभाजीनगर, पुणे, मुंबई कडे जाण्याची गरज नाही. या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण प्राप्त करण्याची ही उत्तम संधी आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी यांनी Master of Social Work (MSW), Bachelor of Social Work (BSW) व Bachelor of Computer Application (BCA) या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविणे व अधिक माहिती प्राप्त करणे संदर्भात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथे भेट द्यावी, असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments