HomeनांदेडCIDCO ; सिडको परिसरातील नागरी सुरक्षा संदर्भात काँग्रेस कडून ग्रामीण पोलीस स्टेशन...

CIDCO ; सिडको परिसरातील नागरी सुरक्षा संदर्भात काँग्रेस कडून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निवेदन

नवीन नांदेड l सिडको हडको भागातील नागरी सुरक्षेच्या बाबीकडे काँग्रेसने विशेष लक्ष देत काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको काँग्रेस प्रभारी बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वात गुरुवार (ता.२६) रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना निवेदन दिले आहे,यास पोलीस निरीक्षक यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सिडको हडको भागातील शाळेच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळात पोलीस पेट्रोलिंग करण्यात यावी, रविवार व गुरुवार या आठवडी बाजारा दरम्यान विशेष करून संध्याकाळी साडेपाच ते साडेसात आठ वाजेदरम्यान दोन तिन पोलिसांचा बंदोबस्त द्यावा, मनुृष्यबळाची कमतरता असले तरी हडको बसस्थानक येथे दोन पाळी मध्ये एक पोलीस शिपाई किवा दोन होमगार्ड यांचा बंदोबस्त नियमित लावण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको काँग्रेस प्रभारी बापूसाहेब पाटील, सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश पाटील शिंदे, सिडको ब्लॉक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रसेनजित वाघमारे,अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष लतीफ शेख, सिडको अल्पसंख्याक अध्यक्ष नरुद्दीन शेख,शेख मोईन लाठकर,वार्ड अध्यक्ष देविदास कदम,प्रभू उरुदवाड, देविदास कहाळेकर,माणिक श्रोते आदीसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments