CIDCO ; सिडको परिसरातील नागरी सुरक्षा संदर्भात काँग्रेस कडून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निवेदन
नवीन नांदेड l सिडको हडको भागातील नागरी सुरक्षेच्या बाबीकडे काँग्रेसने विशेष लक्ष देत काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको काँग्रेस प्रभारी बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वात गुरुवार (ता.२६) रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना निवेदन दिले आहे,यास पोलीस निरीक्षक यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सिडको हडको भागातील शाळेच्या भरण्याच्या व सुटण्याच्या वेळात पोलीस पेट्रोलिंग करण्यात यावी, रविवार व गुरुवार या आठवडी बाजारा दरम्यान विशेष करून संध्याकाळी साडेपाच ते साडेसात आठ वाजेदरम्यान दोन तिन पोलिसांचा बंदोबस्त द्यावा, मनुृष्यबळाची कमतरता असले तरी हडको बसस्थानक येथे दोन पाळी मध्ये एक पोलीस शिपाई किवा दोन होमगार्ड यांचा बंदोबस्त नियमित लावण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काँग्रेस जिल्हाप्रवक्ते तथा सिडको काँग्रेस प्रभारी बापूसाहेब पाटील, सिडक...
