Wednesday, May 13

स्व. डॉ. पी.जी. कल्याणकर यांनी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने काम केले : डॉ किन्हाळकर

नांदेड l वैद्यकीय व्यवसायात काम करताना स्व. डॉ. पी. जी. कल्याणकर यांनी निस्वार्थ भावनेने काम केले. तसेच संघटनेच्या माध्यमातून डॉक्टरांच्या समस्याही सोडविल्या, अशा शब्दात माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी डॉ.पी. जी.कल्याणकर यांच्या कार्याचा गौरव केला.

रयत रूग्णालयाचा अतिदक्षता विभाग व सोनोग्राफी सेंटरचे नामकरण आणि लोकार्पण सोहळयात अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र झोपडपटटी निर्मुलन प्रकल्प, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, सौ. कलाराणी कल्याणकर, नांदेड जिल्हाधिकारी डॉ. राहूल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, रयत हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे तसेच डॉ. एम. एस. पाटील, डॉ. भट्टड यांची प्रमुख उपस्थिती होती.

IMG 20260330 WA0011 स्व. डॉ. पी.जी. कल्याणकर यांनी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने काम केले : डॉ किन्हाळकर

यावेळी बोलताना डॉ. किन्हाळकर म्हणाले की, डॉ. पी. जी. कल्याणकर यांनी लोकांची सेवा करण्यात धन्यता मानली. त्यांचे ज्ञान चौफेर होते तर, निरीक्षण सखोल होते. जीवन कसे जगावे याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी सर्वांसमोर ठेवला. मिळालेले ज्ञान लोकांच्या उपयोगी कसे पडले पाहिजे ? हे त्यांच्याकडून शिकले पाहिजेत. रयत रूग्णालयाने खर्‍या अर्थाने रयतेचा विश्वास संपादन केला असून गरजू लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहचवली आहे. आता अशा संस्था जगवण्याची जबाबदारी पुढच्या पिढीची आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, रयत चॅरिटेबल हॉस्पीटलचा उपक्रम अत्यंत स्तूत्य आहे. स्व. डॉ.पी.जी.कल्याणकर यांचे सुपूत्र डॉ. महेंद्र कल्याणकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शाळा व रूग्णालय यासारख्या सेवा देण्यात शासना सोबत समाजाने देखील काही जबाबदारी उचलली पाहिजे. माझे वडिल डॉ.पी. जी. कल्याणकर यांनी मला दिलेली शिकवण माझ्यासाठी खूप मोलाची आहे. रयत हॉस्पीटलचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याची संधी दिल्या बददल त्यांनी रयत टिमचे आभार मानले.

प्रारंभी डॉ. सुरेश खुरसाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात रयतच्या खडतर प्रवासात देणगीदारांमुळे मोठे बळ मिळाले, असे सांगितले. डॉ.दि.भा. जोशी, रेवणसिध्द लामतूरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मान्नीकर यांनी केले. या कार्यक्रमाला कल्याणकर कुटूंबातील डॉ.नरेंद्र कल्याणकर, डॉ. बाळकृष्ण लामतूरे, सौ. वैशाली लामतुरे, डॉ. गितांजली एम्पल्ले, कैलास कल्याणकर व इतर सदस्य तसेच रयतचे सौ.शोभा सुरेश खुरसाळे, डॉ. मापारे, एम. आर. जाधव, सुधाकर टाक धानोरकर, बापुराव गजभारे, मुकुंद जवळगावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!