किनवट, परमेश्वर पेशवे l विराट हिंदू युवती व महिला संमेलन मकर संक्रात निमित्त किनवट गजानन बाबा मंदिर येथे संपन्न झाले. या हिंदू युवती महिला संमेलनामध्ये किनवट माहूर आदीलाबाद परिसरातील हजारो महिला या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पूजनीय संत ह भ प नारायण महाराज माधापुरकर होते. तसेच या कार्यक्रमाचे वक्ते म्हणून कांचन दीदी मोफुलवार हैदराबाद या उपस्थित होत्या. या संमेलनामध्ये पुजनीय संतांनी मार्गदर्शन करताना, देश धर्मासाठी युवती व महिलांचे योगदान हे देशाला वैभवशाली बनवणारा आहे .

म्हणून अशा मकर संक्राती परवा निमित्त ह्या आयोजित सभेमध्ये आलेल्या युवती व महिलानी आपल्या सामाजिक कामाची जाण ठेवून, समाजामध्ये संस्कार निर्माण करून हा देश सुसंस्कृत होण्यासाठी महिलांची मोठे योगदान आहे. म्हणून आईने केलेली सेवा आईने केलेला कार्य हे देश देशासाठी आहे म्हणून महिलांनी आजच्या काळामध्ये युवतीकडे लक्ष देऊन व आपल्या परिवाराकडे लक्ष देऊन देशासाठी कार्य करावं असे विचार महाराजांनी युवती महिला संमेलनामध्ये मांडले. तसेच या कार्यक्रमाचे वक्ते श्रीमती कांचन दीदी यांनी आपले विचार मांडताना महिला या देशाची एक रक्षक व सक्षम सक्षम स्त्री आहे.

त्यामुळे महिलांनी आपल्या परिवारातील सर्व कुटुंबातील मुला मुलीना चांगले संस्कार देऊन देश कार्यासाठी व मुलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी त्यांना पुढाकार घेण्यासाठी त्यांना प्रवर्त करावे व त्यांचे नाव मार्गदर्शन करावे त्यामुळे प्रत्येक स्त्री ही आपल्या घरातील एक शिक्षिका आहे. व ती सक्षमपणे आपल्या मुली व मुलांना त्यांनी देश धर्माचे धडे देऊन व शिक्षण व्यवसाय असे अनेक विषयांमध्ये कुटुंबाचा उदय निर्वाह व्हावा. यासाठी स्वतःच्या पायावर उभा करण्याची हिम्मत प्राप्त व्हावी यासाठी आई म्हणून भूमिका महत्त्वाची आहे.

त्याच्या विराट युवती महिला संमेलनामध्ये माझ्या वतीने मला ह्या विराट स्वरूप महिलांचे पाहून व या विराट युतींचे ंचा स्वरूप पाहून मला नक्की असे वाटत आहे की आज आपल्या भागातील युवती व महिला या नक्कीच या देशासाठी कार्य करतील. व देशाला वैभवशाली बनवतील कुटुंबाच्या आधार बनतील अशा प्रकारची आज असणारी ही नारीशक्ती या आजच्या मकर संक्रांतीनिमित्त चार युवती महिला मेळाव्यामध्ये त्या विराट स्वरूपाने दिसून येत आहे.

आणि अजून माझ्या मनात जे काही मी आपल्यासमोर मांडलेले विचार आपण ऐकला आणि हे विचार आत्मसात कराल आणि नक्कीच या देश आणि धर्मासाठी आपली युवती महिला कार्य करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझं भाषण संपते जय हिंद जय भारत या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रेरणादायी प्रेरणाताई पेरलावार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा केंद्रे यांनी केलं. आभार प्रदर्शन सौ पत्की मॅडम यांनी मांडले. व या कार्यक्रमांमध्ये हनुमान चालीसा कुमारी वर्षा माने यांनी गायले व परिसरातील हजारो युवती महिला उपस्थिती होती.