किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयातील अभियंता एस एस कावळे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असून गोकुंदा बोधडी बु, नंदगाव, घोटी,बेलोरी,निचपूर, भीमपूर, सारखणी अंबाडी कमठला ईत्यादी ग्रामपंचायतमध्ये विविध विकास कामे झालेली नसतानाही त्यांनी बनावट मोजमाप पुस्तिका तयार करून निधी उचलण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बोगस कामांना प्रोत्साहन देणाऱ्या उपअभियंत्याची तात्काळ बदली करावी अशी लेखी तक्रार शिवसेना (उभाटा)गटाचे तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे.

तक्रारीत नमूद केले की किनवट येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात कार्यरत असलेले उपअभियंता एस एस कावळे यांच्या बोगस कारभाराविरोधात अनेक तक्रारी प्राप्त असून प्रत्यक्षात कामे झालेली नसतानाही त्यांनी कामाच्या मोजमाप पुस्तिका तयार करून निधी उचलण्यास मान्यता दिली आहे.

किनवट तालुक्यातील गोकुंदा बोधडी बु,नंदगाव, घोटी, बेलोरी, निचपुर,भिमपूर,सारखणी, अंबाडी कमठला या ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या विविध विकास कामाच्या बोगस मोजमाप पुस्तिका प्रकरनी त्यांची चौकशी सुरू असताना व चौकशी अहवाल पूर्ण न होता त्यांना पुन्हा याच ठिकाणी उपअभियंता म्हणून नियुक्त देण्यात आली आहे.बोगस व भ्रष्ट उपअभियंत्याला पुन्हा पदभार दिल्याने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत उपअभियंता एस एस कावळे यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारोती दीवसे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे.
