नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद शाळा भायेगाव येथे 15 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रमेश बाबुराव कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम रावसाहेब खोसडे यांची बिनविरोध निवड,पण शिक्षक प्रेमी या जागे साठी मतदान झाले आहे.

या जागेवर राहुल गणपती खोसडे 29मते घेऊन विजय झाले आहेत .निवड झालेल्या पदाधिकारी यांच्ये ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून बालाजी चपंती कोल्हे,पश्रीरंग रावसाहेब खोसडे, रमेश मारोती कोल्हे, गंगाधर सोनाजी कोल्हे,दिंगबर नागोराव भालेराव, ज्ञानेश्वर रामचंद्र कोल्हे,शिवकांत सौभाजी मेकाले,व्यंकटी कामाजी कोचावर, गंगाधर माधव कोल्हे,अशूमंती संतोष यनावार यांच्यी निवड करण्यात आली, यावेळी बिनविरोध निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व शिक्षण प्रेमी, सदस्य यांच्ये सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य व गावकरी , युवक , शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
