HomeउमरखेडUmarkhed taluka! उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर! शेतकरी व कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान...

Umarkhed taluka! उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर! शेतकरी व कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान – प्रशासनावर नाराजी

उमरखेड| यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात काल शुक्रवार पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावोगाव पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागांचा संपर्क तुटला आहे.

शेतीमध्ये पाणीच पाणी झाले असून, उभ्या पिकांचा नायनाट होऊन, घरांमध्ये कंबरभर पाणी, जनावरं वाहून जाण्याचे प्रकार समोर आले आहेत. निसर्ग कोपल्याने शेतकरी व कष्टकरी वर्ग हतबल झाला आहे. कधी नव्हे तेवढा पाऊस होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून, शेतकरी तरी पुरता नागवला गेला आहे. शासनाची चिमूटभर मदत शेतकऱ्यांच्या जखमा भरू शकत नाहीत अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत असून, शासनाने हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना वाचवावे अशी मागणी केली जात आहे.

IMG 20250927 180708 Umarkhed taluka! उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर! शेतकरी व कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान – प्रशासनावर नाराजी
Oplus_16908288

एव्हढी मोठी विदारक परिस्थिती उद्भवली असताना प्रशासनाने अजून पाहणी केली नसल्याने नागरिक नाराज आहेत. शेतकऱ्यांची मागणी आहे कि, शासनाने १००% ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, पुनर्वसन करून मदतकार्य सुरू करावे. हवामान खात्याने पुढील ३-४ दिवस अजून पावसाचा इशारा दिल्याने भीतीचं वातावरण आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढे यावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments