नांदेड| ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल ललित कला प्रतिष्ठान (Lalit Kala Pratishthan) नांदेड च्या वतीने त्यांचा नांदेडमध्ये नुकताच सुधीर रसाळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

हॉटेल विसावा पॅलेस येथे पार पडलेल्या या हृदय सत्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांचे पाय जमिनीवर राहत नाहीत मात्र माझे पाय कायम जमिनीवर राहावेत यासाठी शुभेच्छा द्या. अशा भावना यावेळी सुधीर रसाळ यांनी व्यक्त केल्या. सुधीर रसाळ यांच्या ‘ विंदांचे गद्यरूप ‘ या समीक्षा ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील साहित्य क्षेत्राचा हा सर्वोच्च सन्मान ठरला असून सुधीर रसाळ यांना मिळालेला पुरस्कार मराठवाड्यातील साहित्याची मोठी उंची वाढवणार आहे.

त्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधीर रसाळे यांचा नांदेड शहरात ललित कला प्रतिष्ठानच्या वतीने हॉटेल विसावा पॅलेस येथे हृदय सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला ललित कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी एबितदार , ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रतिष्ठानचे पदाधिकारी देविदास फुलारी , ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, गजानन पाटील मुधोळ, दिगंबर कदम , प्रा. महेश मोरे, राम तरटे, शिवा कांबळे, शारदा इबीतदार , शेख निजाम गवडगावकर, बापू दासरी, ज्वाला मुधोळ, प्रा. हेमलता पाटील, प्राचार्य नागनाथ पाटील आदींची उपस्थिती होती.

सत्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त होताना सुधीर रसाळ म्हणाले की , साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद झाला आहे . परंतु माझे पाय जमिनीवर रहावेत यासाठी तुम्ही मला शुभेच्छा द्या. कारण पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक जणांचे पाय जमिनीवर राहत नाहीत . ते हवेत असतात . ही परिस्थिती माझ्या नशिबी येऊ नये आणि माझे पाय जमिनीसोबत कायम जुळलेले असावेत यासाठी शुभेच्छा द्या. असा पुनरुच्चारही रसाळ यांनी यावेळी केला.
