राष्ट्रीय विचारकांना, प्रांतीय विचारात अडकून डॉ. हेडगेवार यांचाही राष्ट्रीय विचार संकुचित करण्याचा केला प्रयत्न… मोठ्या प्रमाणात रेल्वेचे आवागमन असलेल्या आणि मोठे रेल्वे स्टेशन असलेल्या निजामबाद या रेल्वे स्टेशनला डॉ. हेडगेवार यांचे नाव देण्याची मागणी होती.. मूळ देगलूर येथील रहिवासी असलेले , नांदेडचे माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देण्याची मागणी केल्यानंतर अजित गोपछडे यांची मागणी अत्यंत संकुचित वाटली…

मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंदराव पानसरे यांनी गोविंदरावांचे कार्य जाणून होते… हुतात्मा दिनापूर्वी हुतात्म पत्करलेल्या यांची केला अवहेलना… निवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ नागरिक ,मोरे यांनी व्यक्त केले विचार…… रेल्वे स्टेशन धर्माबादला “हुतात्मा गोविंदराव पानसरे”, यांचे नाव देणे, अगदी रास्त आहे.

हु. गोविंदराव पानसरे हैद्राबाद मुक्ती लढ्यातील पहिले हुतात्मा होत. त्यांचा जन्म मराठवाड्यातील छ. संभाजीनगर जिल्ह्यातील बदनापूर येथे दि. १५ मे १९१४ रोजी झाला. ते केवळ ६ महिन्याचे असतांना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मामांनी त्यांचे पालनपोषण केले. ते धर्माबाद येथे रेल्वेत स्टेशन मास्तर होते.

त्याकाळी जुलमी निजामी राजवटी विरोधात हुं. गोविंद पानसरे यांनी आपल्या भाषणातून लढा उभारला होता. चवताळलेल्या निजामाच्या रझाकारांनी हुं. गोविंद पानसरे हे बैलगाडीने धर्माबादला जात असतांना बिलोली पासून अवघ्या ५ कि.मी. अंतरावरील अर्जापूर येथे त्यांची दि. २१ आक्टोबर १९४६ रोजी क्रुरपणे हत्या केली. हैद्राबाद मुक्ती लढ्यातील पहिले हौतात्म्य त्यांना प्राप्त झाले. म्हणून ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, समाजसेवक यांनी कांहीं महिन्यांपूर्वी सर्वप्रथम, धर्माबाद रेल्वे स्टेशनला, “हु. गोविंद पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देण्यात यावे, अशी केलेली मागणी ही अगदी रास्त आहे.

असे असतांना, नांदेडचे राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार माननीय अजित गोपछडे धर्माबाद रेल्वे स्टेशनला राष्ट्रीय जनसंघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे , असे निवेदन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना कांहीं दिवसांपूर्वी दिलेले समाज माध्यमांवर दिसून आले आहे. हे कृत्य हु. गोविंदराव पानसरे यांच्या नावाला विरोध करून हैद्राबाद मुक्ती लढ्यातील सर्वच हुतात्म्यांची प्रतारणा करणारे आहे.
डॉ. केशवराव हेडगेवार यांचा जन्म दि. १ एप्रिल १८८९ रोजी धर्माबादच्या पूर्वेला १० कि.मी. अंतरावरील आताच्या तेलंगणा राज्यातील कंदाकुर्ती येथे झाला आहे. डॉ. केशवराव हेडगेवार यांचे हिंदुंना संघटित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आहे. त्यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवरील आहे. त्यांचा नैसर्गिक मृत्यू दि. २१ जून १९४० ला नागपूर येथे झाला. यास्तव खा. अजित गोपछडे माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी नविन कोणत्याही वादाला तोंड फुटू नये यासाठी, “डॉ. केशवराव हेडगेवार” यांचे नाव जवळच्याच निजामाबाद रेल्वे स्टेशनला देण्याचे पत्र रेल्वे मंत्र्याला द्यावे. यातच सर्वांचे हित सामावलेले आहे.
आणि हु. गोविंद पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देऊन, हु. गोविंद पानसरे यांच्या हौतात्याची जाणीव नविन पिढीला सतत जागृत रहावी यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले तर, हु. गोविंद पानसरे यांचे व्यर्थ न ठरो हे बलिदान असे म्हणता येईल. ही नम्र विनंती.
लेखक – भाऊराव मोरे, अभ्यासगट प्रमुख, मराठवाडा जनता विकास परिषद, नांदेड. मो. ९४२३३०५५५३.