किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातीलआदिवासी व दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या इस्लापूर या ठिकाणी मोफत कायदे विषयक शिबिर (Organized Law Camp) व फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन दिनांक 21 जानेवारी रोजी करण्यात आले होते.

या लोकन्यायालयात 36 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या फिरत्या लोकन्यायालयात विद्यार्थ्यांना व परिसरातील जनतेला कायदेविषयक सल्ला देत असताना निवृत्त न्यायमूर्ती शेख यांनी गर्भलिंग तपासणी , वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक माहिती, शाळेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी मोबाईल संदर्भात व इतर काही व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये मोबाईलवर येणारे फ्रॉड कॉल व त्याच्यावर होणारी फसवणूक या संदर्भात सुद्धा जनजागृती होणे आवश्यक असून त्याविषयी सुद्धा जनतेने जागृत राहावे.

तसेच मुख्य रस्त्यावरून चालत असताना अगोदर डाव्या बाजूने चालण्याचा कायदा होता पण आता उजव्या बाजूने चालण्याचा कायदा झालेला आहे तेव्हा सर्वांनी उजव्या बाजूने चालण्याची सवय लावून घ्यावी. व कायदा मोडू नये अशावेळी अपघात झाल्यास अपघाताचा मावेजा आपल्याला मिळू शकत नाही तेव्हा कायद्यांचे सर्वांची पालन करावे या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रकाशझोत टाकला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या लोकांना ज्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा लोकांना सुद्धा विधी सेवा समिती लोकन्यायालयामार्फत मोफत कायदेविषयक सल्ला पुरवल्या जातो. अशा स्वरूपाची माहिती याप्रसंगी फिरते लोक न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश शेख यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी येथील सरपंच सौ शारदा शिनगारे उपसरपंच सौ. निर्मला दूरपडे ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.आर.डी. सोनकांबळे, विधी तज्ञ ऍड. टी. एच. कुरेशी, ऍड .हरि दर्शनवाड, शेख मुजाहिर, कोंडे एस.डी., पोलीस उपनिरीक्षक अतुल डाके, पंचायत समिती विस्तार अधिकारी जीवन कांबळे, माजी सरपंच देविदास पळसपूरे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम चव्हाण कुपटी येथील बापूराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बोनगीर,ग्रामसेवक मलेश आमडेलू नारायण सिनगारे , बालाजी दूरपडे, राजू आंबटवाड,आडेलू पोहेकर, सूर्यकांत बोधनकर पांडुरंग मुधोळकर पत्रकार परमेश्वर पेशवे, नारायण दंतलवाड, गौतम कांबळे, राजेश गायकवाड, प्रमोद जाधव, गणेश एमजलवाड व इयत्ता नववी, दहावी मधील विद्यार्थिनी महिला आणि पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात या कायद्येविषयक सल्ला शिबिरात सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पांडे सर यांनी केले.
