Organized Law Camp : इस्लापूर येथे कायदे विषयक शिबिर व फिरते लोकन्यायालयाचे आयोजन
किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातीलआदिवासी व दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या इस्लापूर या ठिकाणी मोफत कायदे विषयक शिबिर (Organized Law Camp) व फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन दिनांक 21 जानेवारी रोजी करण्यात आले होते.
या लोकन्यायालयात 36 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या फिरत्या लोकन्यायालयात विद्यार्थ्यांना व परिसरातील जनतेला कायदेविषयक सल्ला देत असताना निवृत्त न्यायमूर्ती शेख यांनी गर्भलिंग तपासणी , वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक माहिती, शाळेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी मोबाईल संदर्भात व इतर काही व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये मोबाईलवर येणारे फ्रॉड कॉल व त्याच्यावर होणारी फसवणूक या संदर्भात सुद्धा जनजागृती होणे आवश्यक असून त्याविषयी सुद्धा जनतेने जागृत राहावे.
तसेच मुख्य र...
