श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| सहाव्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या देवांश पंकज गिऱ्हे याची इस्रो सहलीसाठी निवड (Devansh Girhe will go on an ISRO trip) झाली आहे. देवांश हा तालुक्यातील उमरा या छोटया गावातील पंकज गिऱ्हे यांचा मुलगा असून तो यवतमाळ येथिल जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी संचालित यवतमाळ पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे.

अभ्यासात सातत्य राखत देवांश गिऱ्हे याने नोबेल फाउंडेशन जळगाव अंतर्गत राज्यस्तरावर एन.एस.टी. एस अर्थात नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षेत आणि मुलाखतीत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याची इस्रो सहली करिता निवड झाली आहे. या शैक्षणिक सहलीत तो आयआय-टी गांधीनगर, आयआयएम अहमदाबाद, सायन्स सिटी, साबरमती आश्रम व अक्षरधाम मंदिर इथे भेट देणार आहे.
