देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर, तालुका देगलूर जि. नांदेड भागामध्ये सलग पडत असलेल्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील सोयाबीन, कापूस, तुरी, उडीद, मुग यासह रब्बी पिकांची तयारी करणे कठीण झाले आहे. तसेच जनावरांचे मृत्यू आणि मातीची खराब स्थिती यामुळे शेतकऱ्यांचे जीवन हवालदिल झाले आहे.


शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने प्रति गुंठा केवळ ८५ रुपये मदत जाहीर केली असून, त्यावर त्यांच्या उदरनिर्वाहाचा खर्च होत नाही. जवळपास ४०,००० रुपये खर्च करून शेतकऱ्यांना मिळणारी मदत केवळ ३,५ हजार रुपये ही लाजिरवाणी बाब आहे.



शेतकऱ्यांची मागणी आहे की, खासदार आणि आमदारांचे पगार थेट शेतकऱ्यांसाठी वापरात आणावा. तसेच महाराष्ट्रातील मंदिरांत जमा असलेली देणगी शेतकऱ्यांच्या सशक्तीसाठी वापरण्यात यावी. शेतकऱ्यांनी म्हटले की, हे पगार आणि निधी शेतकऱ्यांना दिल्यास कर्जमुक्ती आणि जीवनमान उभे राहण्यास मदत होईल.


हवामान अंदाजानुसार ३० सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू राहणार असल्यामुळे उभ्या पिकांची नुकसानाची शक्यता वाढली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पिकांचे कोम फुटणे आणि पिकांचे सडणे यामुळे शेतकऱ्यांच्या भविष्याची आशा धूसर झाली आहे.




