Telangana Police Action : धर्माबाद येथील अवैध वाळू तस्करांवर तेलंगणा पोलिसांची धडक कारवाई

IMG 20260319 WA0004 Telangana Police Action : धर्माबाद येथील अवैध वाळू तस्करांवर तेलंगणा पोलिसांची धडक कारवाई

धर्माबाद/म्हैसा| धर्माबाद परिसरातून तेलंगणा राज्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांवर तेलंगणा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन लॉरी, एक हायवा, एक जेसीबी आणि एक दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

निर्मल जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक साई किरण यांनी भैन्सा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, निर्मल जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक जानकी शर्मिला यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक व साठवणुकी विरोधात कठोर कारवाई सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी बासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी धर्माबाद भागातून बासर व निजामाबादच्या दिशेने अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित वाहने जप्त केली.

IMG 20260319 WA0005 Telangana Police Action : धर्माबाद येथील अवैध वाळू तस्करांवर तेलंगणा पोलिसांची धडक कारवाई

जप्त करण्यात आलेल्या वाळूची अंदाजे किंमत १ लाख १ हजार ४०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक तपासात या अवैध वाळू वाहतुकीमागे धर्माबाद परिसरातील शेख रौफ याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

त्याच्यावर यापूर्वीही पीडीएस तांदूळ वाहतूक प्रकरणासह इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक आणि साठवणुकीत सहभागी असणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एएसपी साई किरण यांनी दिला. या कारवाईत सहभागी झालेल्या पोलिस पथकाचेही त्यांनी कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top