HomeकरियरGas Shortage : गॅस टंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना

Gas Shortage : गॅस टंचाईचा फटका जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना

हिमायतनगर, अनिल मादसवार| देशात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा थेट परिणाम आता शिक्षण क्षेत्रावर दिसू लागला आहे. हिमायतनगर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत मागील तीन दिवसांपासून खिचडी शिजवली गेली नसल्याने तब्बल ६०० विद्यार्थि शालेय पोषण आहारापासून वंचित राहिले आहेत.

हिमायतनगर येथील जिल्हा परिषद शाळा दोन सत्रांमध्ये चालवली जात असून, विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या पोषणासाठी शालेय खिचडी हा महत्त्वाचा आधार आहे. मात्र गॅस उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाक पूर्णपणे ठप्प झाला आहे. या संदर्भात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाळजकर यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, “गॅस बुकिंग होत नसल्यामुळे खिचडी शिजवता आलेली नाही,” अशी माहिती देण्यात आली.

दरम्यान, तीन दिवसांपासून पोषण आहार बंद असल्यामुळे विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांना पोषण आहार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

शालेय पोषण योजनेवरच प्रश्नचिन्ह..?

सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेची गैस उपलब्ध होत नसल्याने अंमलबजावणीच ढासळल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, संबंधित विभागाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत मुख्याध्यापक श्री कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, शाळेत गॅस नाही हे सत्य असून, तीन दिवस खिचडी शिजली नाही हे चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments