नांदेड| दिनांक १ रोजी भोकर पोस्ट ऑफिस मध्ये टपाल जीवन विम्याचा १४१ वा वर्धापन दिवस (New Postal Life Insurance Policy) सहाय्यक डाक अधीक्षक मुख्यालय विनोद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते पॉलिसी धारकांचा सत्कार करून व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

केंद्र व राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी व व्यापारी, डॉक्टर,इंजिनिअर वकील डिग्री धारक,आय. टी.आय धारक टपाल जीवन विम्याचा पन्नास लाखा विमा रकमेचा लाभ घेऊ शकतात.तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांनी आधार कार्ड व पैन कार्ड असेल तर दहा लाखापर्यंत ग्रामीण डाक जीवन विम्याचा लाभ घेता येतो. आज टपाल जीवन विम्याचा वर्धापन दिनानिमित्त मा.डाक अधीक्षक मोहमद खदीर साहेब यांच्या मार्गर्शनाखाली डाक कर्मचाऱ्यांनी नवीन टपाल जीवन विमा पॉलिसी ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून जास्तीत जास्त काढल्या.

भोकर पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यानी एकाच दिवसात तीन कोटी,३६ लाख रकमेच्या टपाल जीवन विमा पॉलिसी काढण्यात आल्या आहेत.तर नांदेड नांदेड जिल्ह्यातील डाक कर्मचाऱ्यांनी सातशे सत्तर लोकांचे एकूण २९ कोटी ९२ लाख ९० हजार (एकोणतीस कोटी, ब्यानव लाख, नव्वद हजार ) विमा रकमेच्या टपाल जीवन विमा पॉलिसी काढण्यात डाक विमा सल्लागार व डाक कर्मचाऱ्यांना यश आले आहे. या मध्ये सर्वात जास्त डाक विमा सल्लागार नांदेड निखिल सिंगेवार यांनी एक कोठी पस्तीस लाख विमा पॉलिसी काढून प्रथम क्रमांक मिळविला आहे.

डाक कर्मचारी शैलेश चक्रवार यांनी तेवीस लाखाचां विमा पॉलिसी काढली आहे तर मारोती निलावार यांनी ५५ लाखांचा विमा पॉलिसी ग्राहकाच्या काढल्या आहेत. तसेच डाक निरीक्षक, ग्रामीण डाक सेवक यांनी पण टपाल जीवन विमा पॉलिसी काढल्या आहेत. भोकर पोस्ट ऑफिस अंतर्गत सोळा शाखा डाकघर आहेत. ई. स.१८८४ ब्रिटिशाच्या काळा पासुन सुरु झालेली सर्वात जुनी टपाल जीवन विमा पॉलिसी (पी एल आय) १ एप्रिल २०२४ ते १ फेब्रवारी २०२५ या काळात हजारो नागरिकानी पॉलिसी काडून पैशाची गुंतवणुक केली आहे. टपाल जीवन विमा पॉलिसी मध्ये ईतर विम्यापेक्षा फायदा अधिक जास्त मिळतो. वार्षिक हप्ता घेतल्यास २% सूट पॉलिसी धारकांना मिळतो.तसेच पास बुक सुविधा उपलब्ध आहे आणि ऑनलाईन पॉलिसी चा हप्ता भरण्याची सुविधा पण पोस्ट ऑफिसनी सुरुवात केली आहे.

टपाल जीवन विम्याचा वर्धापनदिनानिमित्त सहायक डाक अधीक्षक श्री. विनोद कुलकर्णी व टपाल जीवन विमा विकास अधिकारी श्री. कैलास बडूरवार यांनी कर्मचाऱ्याना व ग्राहाकाना टपाल जीवन विमा पॉलिसी चे फायदे समजावून सांगितले. या वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी डाक निरीक्षक भोकर श्री. प्रवीण भांजी, सब पोस्ट मास्तर श्री. जी. एस. नलावार, माजी मार्केटिंग अधिकारी श्री. सुरेश सिंगेवार,डाक सहायक श्री. कैलास पाटील, सूर्यभान मोकळे, शैलेश चक्रवार, संतोष डोईफोडे, प्रकश भोकरकर, व्ही.के.कदम, मारोती निलावार, राहुल जगमे, व ग्रामीण भागातील डाक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.