देगलूर, गंगाधर मठावाले| तालुक्यातील मौजे शहापूर येथील शेतकरी कामगार जनतेला कृषी कर्ज देण्यासाठी वेठीस धरलेल्या आयडीबीआय बँक व्यवस्थापकाच्या मुजोर कारभाराचा भांडाफोड करत औरंगाबाद येथील वरिष्ठ अधिकारी श्री रवि सर यांच्या समोर मांडल्या आहेत. आत्तातरी सर्वसामान्यांना बैंकेत येणाऱ्या अडचणी सुकर होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बँक व्यवस्थापकाचा कारभार हाती घेतल्यानंतर कृषी कर्जासाठी शेतकऱ्याना, व्यवसाय करणाऱ्या ना सोने तारण ठेवून देखील कर्ज उपलब्ध होत नाही. देगलूर तालुक्यातील उपबाजार पेठ म्हणून नावारूपास आलेल्या शहापूर येथील आयडीबीआय शाखेस चोवीस गावाचा संपर्क असुन, आडत, सराफा, होलसेल किराणा दुकान असल्याने जनता रक्कम पुढील व्यापाऱ्यांना पाठवण्यासाठी बँकेशी हितगुज करतात.

मात्र व्यवस्थापकाच्या नाकर्तेपणा आणि ग्राहकांशी केली जाणारी पतन वागणूक या भोगळ कारभाराने सर्वसामान्य जनता वैतागली आहे. येथील सामाजिक अडचणीला वाचा फोडणारे पत्रकार यांनी पुढाकार घेऊन बैंकेच्या मनमानी कारभाराचा भांडाफोड केल्याने वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. याच संदर्भात गावातील व्यापारी, नागरिक, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयडीबीआय बँकेत एक छोटे खानी बैठक घेण्यात आली. त्यात एका एकाने वरिष्ठ समोर अडचणींनाच भडीमार करून बैंकेत येणाऱ्या व्यथा मांडल्या यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येत्या दोन तीन दिवसात सर्वांच्या अडचणी सॊडविण्यात येईल असे उपस्थित ग्राहकांना सांगितले.
