Homeनांदेडमुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था, तात्काळ दुरूस्ती मागणी...

मुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था, तात्काळ दुरूस्ती मागणी -NNL

नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या संदर्भात आ. मोहनराव हंबर्डे व बांधकाम विभाग अधिकारी व संबंधित गुतेदाराची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करण्याचे आश्वासन संबधित गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांना देण्यात आले,मात्र या रस्त्याचा दयनीय अवस्थे मुळे वाहन धारकांना व नागरिक यांना त्रास सहन करावा लागला आहे.

नांदेड लातूर महामार्ग वरील मुसलमान वाडीपाटी पासून हा रस्ता जवळपास सोळा गावांना जोडला गेला असून खुपरसवाडी, मारकंड, पिंपळगाव,बामणी, भणगी,बेट सांगवी, वाहेगाव,गंगा बेट यासह अनेक गावाचा प्रमुख रस्ता असुन या रस्त्यावर शैक्षणिक संस्था व मंदिरात जाणारे येणारे भाविक भक्तांची व अनेक गावातील ग्रामस्थ व शाळांना जाणाऱ्या येणाऱ्या विधार्थी व दुध वाले यांच्यी मोठया प्रमाणात येजा असते परंतु हा रस्ता खोदल्या गेल्याने व झालेल्या पावसाने रस्ता चिखमलय होवून गेला आहे, अनेक वाहनधारकांना काटकसरत करत आपले गाव जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

या संदर्भात २३ जुन रोजी पिंपळगाव येथे२३ जुन रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती,यावेळी आ. मोहनराव हंबर्डे, बांधकाम विभाग अधिकारी बोथीकर, यांच्या सह मार्कंड चे सरपंच आकाश येवले, पिंपळगाव सरपंच कैलास पाटील पुंड, वाटेगाव सरपंच शंकरराव सोनटक्के, भनगी सरपंच गोविंद मोरे,बामणी सरपंच खुशाल जाधव यांच्या सह सोळा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संबधित अधिकारी यांनी गुतेदार वाकोरे यांना तात्काळ रस्ता दुरस्ती आदेश दिले असून या नादुरुस्त रस्ता मुळे मात्र ग्रामस्थ व वाहनधारक यांच्या मध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments