मुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणारा रस्त्याची दयनीय अवस्था, तात्काळ दुरूस्ती मागणी -NNL
नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुसलमान वाडीपाटी पासून सोळा गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या संदर्भात आ. मोहनराव हंबर्डे व बांधकाम विभाग अधिकारी व संबंधित गुतेदाराची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी तात्काळ रस्त्याची दुरूस्ती करण्याचे आश्वासन संबधित गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांना देण्यात आले,मात्र या रस्त्याचा दयनीय अवस्थे मुळे वाहन धारकांना व नागरिक यांना त्रास सहन करावा लागला आहे.
नांदेड लातूर महामार्ग वरील मुसलमान वाडीपाटी पासून हा रस्ता जवळपास सोळा गावांना जोडला गेला असून खुपरसवाडी, मारकंड, पिंपळगाव,बामणी, भणगी,बेट सांगवी, वाहेगाव,गंगा बेट यासह अनेक गावाचा प्रमुख रस्ता असुन या रस्त्यावर शैक्षणिक संस्था व मंदिरात जाणारे येणारे भाविक भक्तांची व अनेक गावातील ग्रामस्थ व शाळांना जाणाऱ्या येणाऱ्या विधार्थी व दुध वाले यांच्यी मोठया प्रमाणात येज...
