हिमायतनगर,अनिल मादसवार| गेल्या काही महिन्यापासून पैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे गावांतील पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कारण पैनगंगा नदीपात्रातून होत असलेली रेती चोरीमुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर होते आहे. याचा नाहक फटका नागरिकांना, मुक्या जनावरांना व पशु पक्षांना आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या अनेक गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी इसापूर धरणातून नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे.


विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून होत असलेला अविद्या वाळू उपास यामुळे पाणी टंचाईची समस्या वाढू लागली आहे. पाणी टंचाई भासत असल्याने जनतेतून पाणी सोडण्याची मागणी होते आहे. मात्र अद्याप प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. आवश्यकता असतेवेळेस नदीपात्रात पाणी सोडण्यात आले तर पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित होतील. यामुळे तहानलेल्या नागरिकांसह मुक्या जनावरांना व शेतीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा उपलब्ध होऊ शकेल. शेतकरी सुखी तर देश सुखी राहील, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे या मागणीकडे शासनाने तत्काळ लक्ष द्यावे. गंभीर होत असलेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीत मात करण्यासाठी त्वरित उपाययोजना करून इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडावे अशी मागणी नदीकाठावरील अनेक गावांच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टी झाली कि वरील पातळीवर असलेल्या इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सॊडले जाते. यामुळे नदीला पूर येऊन शेतीसह गावागावात पाणी शिरून नागरिक व शेतकरयांचे प्रचंड नुकसान होते. उन्हाळ्यात जेंव्हा शेतकरी पाण्याची मागणी करतात तेंव्हा मात्र इसापूर धरण प्रशासन पाणी सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील अनेक गावच्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, पाण्यासाठी रानोवन भटकंती करावी लागत आहे. पशु पक्षांना पाणी मिळत नसल्याने वन्य प्राणी गावकुशींकडं येत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक गावकर्यांना भोगावा लागतो आहे. पाण्याच्या टंचाईने भविष्यात जीवघेण्या समस्यांचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे.

पैनगंगा नदीपात्रातून रेती चोरीमुळे पाणी टंचाईची समस्या गंभीर
हिमायतनगर – उमरखेड तालुक्याच्या मधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रातून महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध्यरित्या उपसा हतो आहे. या रेती उपसा करण्याच्या धंद्यात जास्तीत जास्त राजकीय वरदहस्त असलेल्या रेतीमाफियांचा समावेश आहे. त्यामुळे शेणाच्या गौण खनिजाचे बेसूमारपणे उत्खनन करून शासनाला चुना लावला जात आहे. रात्रंदिवस रेतीचा अमाप उपसा होत असंल्याने पाणी पातळी खोल जात असून, दिवाळीपूर्वीच नदीपात्र कोरडे पडत आहे. हि बाब लक्षात घेता पैनगंगा नदीवरील विरसनी, पिंपरी, कामारी, घारापुर, रेणापूर, पळसपूर, गांजेगाव बंधारा, डोल्हारी, सिरपल्ली, एकंबा, कोठा, बोरगडी, वारंग टाकळी, मंगरूळ आदी भागातून सुरु असलेल्या रेतीच्या अवैद्य उत्खननावर अंकुश लावावा. आणि जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही अशी मागणी पर्यावरण प्रेमी व पाणी टंचाईने हैराण झालेल्या महिला नागरीकातून केली जात आहे.
