हिमायनगर| शहरातील जनता कॉलनी भागात घरफोडी करून पुन्हा शहरात संशयित रित्या फिरत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून हिमायतनगर पोलिसांनी अटक करून त्याने केलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याने तेलंगणा राज्यात देखील काही ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणे आणि मागील गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक, हिमायतनगर यांना आदेशीत केले होते. दि.02 ते दि.03 जानेवारी च्या दरम्यान विलास लक्ष्मण शिंदे, 45 वर्ष, जनता कॉलनी, हिमायतनगर यांचे रहाते घराचे कुलूप कोणीतरी अज्ञातने तोडून कपाटातील रोख रक्कम 17 हजार 500 रुपयाची घरफोडी करून चोरून नेले. याबाबत हिमायतनगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 02/2025 कलम 305(ए), 331(4) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना दि.08 मार्च 2025 रोजी 16 वाजेच्या सुमारास संशयीत इसम बोरगडी रोड, हिमायतनगर येथे फिरत असल्याची गुप्त माहिती मिळली. त्यावरून पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन मसू व्यंकटी गायकवाड, 40 वर्ष, गणेशवाडी, हिमायतनगर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली.

तसेच पोलीस ठाणे येथे पूर्वाभिलेख तपासला असता तो घरफोडी करणारा सराईत आरोपी असल्याचे आढळून आले. त्याने हिमायतनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये देखील घरफोडीचे गुन्हे केल्याची दाट शक्यता असल्याने त्यास विश्वासात घेऊन तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याचे काबुल केले. आरोपी मसू व्यंकटी गायकवाड यास अटक करून घरफोडी केलेल्या रक्कमेपैकी 14,000/- रुपये रोख रक्कम हस्तगत करून हिमायतनगर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

घरफोडी गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक आरोपीताने इस्लापूर पोलीस ठाणे येथे एक घरफोडी तसेच भैसा पोलीस ठाणे, तेलंगना येथे 04 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत संबंधीत पोलीस ठाणेस कळविण्यात आले असून, हि कार्यवाही अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, डॅनियल बेन, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे, पोल्सी शिपाई सदावर्ते यांनी केली आहे. हिमायतनगर पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.