नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांना ग्रामीण पोलीस निरीक्षक पदाचा प्रभारी पदभार घेतल्यानंतर त्यांनी आपली मनमानी कारभार करत त्यांनी नागरीकांना वेठीस धरण्याचे काम करत असुन ते पोलीस ठाण्यात नागरीकांची तक्रार न घेता विरोधा कडून हे प्रकरण परस्पर करून घेतात संबंधीत अर्जदारास तक्रार न घेता त्याला पिटाळून लावण्याचे काम करत आहेत असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यी प्रत्यक्ष भेट मागणी केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.


दिलेल्या निवेदनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या कार्यकाळात अवैध व्यवसाय, गुटखा करणाऱ्याना अभय देण्याचे काम करत आहेत,परिसरात गुन्हेगारी करणाऱ्या अभय देत केवळ दिखाव्याचे काम करण्यात ते मशगुल आहेत, त्यांच्याकडे अवैध व्यवसायासाठी काही पदाधिकारी कार्यरत आहेत. व खाजगी व्यक्ती कडून आर्थिक व्यवहार करत आहेत असा आरोप निवेदनात केला आहे.

दि.२ मार्च रोजी वाघाळा पेट्रोल पंपावर डिजल भरुण घराकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या आयचर (टेम्पो) ने जोराची धडक दिली,त्या आयचरला पोलीस ठाण्यात नेऊन आयचर गाडी लावले असता, गुन्हा नोंद होण्याच्या अगोदर ते आयचरगाडी आर्थिक व्यवहार करुण सोडून देण्याचे काम केले.

या प्रकरणी विचारण्या साठी गेलेल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, माजी जि.प.सदस्य मनोहर पाटील शिंदे, यांना समाधान करण्याच्या ऐवजी त्यांना अपमानीत करुन कार्यालय बाहेर काढत असे किती आले आणि किती गेले असे कर्मचाऱ्यांना चिंचोलकर बोलत होते हा अपघाताचा गुन्हा दाखल करण्या साठी तिन ते चार दिवसांनी गुन्हा दाखल केला. या अपघात युवराज शिंदे यांच्या गाडीचा नंबर एम.एच.२६ सी.पी.५१५१ या गाडीला आयचर क्रमांक आर.जे.०९-जी.ई.३०५७ ने अपघात झाला आहे.

या प्रकरणात व ग्रामीण जनतेला दिलासा मिळावा यासाठी ग्रामीण पोलीस निरीक्षक चिचोलकर यांची तात्काळ बदली करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत वाहनात लसुण नाशवंत असल्याने ते वाहन थांबविता येत नसल्याने त्या संबंधी वाहनांचे कागदपत्रे तपासणी करून नोंद घेऊन या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्यात आली आहे व घटने संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.