HomeनांदेडAssistant Inspector of Police : नागरिकांनी आपला परिसर प्लास्टिक मुक्त करावे -...

Assistant Inspector of Police : नागरिकांनी आपला परिसर प्लास्टिक मुक्त करावे – स.पो.नि.पवार

उस्माननगर, माणिक भिसे| माणसाच्या जीवनामध्ये स्वच्छ हवा शुद्ध पाणी सकल व भेसळयुक्त अन्न यातील बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण सार्वजनिक ठिकाणच्या बाबतीमध्ये इतकी उदासीनता का आहे ? अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण असो वा शहरी भाग घनकचऱ्यांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. यामध्ये मुख्यत्वे प्लास्टिकच्या वस्तू व पॉलिथिन बॅग कचऱ्याचा समावेश आहे दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील या वस्तूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जागोजागी प्लास्टिकचा कचरा आपल्याला दिसून येतो त्यामुळे मानवी जीवनासह त्या त्या परिसरातील पशुपक्षी यांचेही जीवन धोक्यात येत आहे.

दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे प्लास्टिक रस्त्यावर व इतरत्र फेकली जातात. प्लास्टिक हे नष्ट होत नाही त्याचा पर्यावरणावर मोठा परीणाम होतो .त्यामुळे आरोग्याला धोका होत आहे . त्यामुळे सर्वांनी आपला परिसर प्लास्टिक मुक्त करावा असे आवाहन उस्माननगर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. चंद्रकांत पवार यांनी केले. पोलीस ठाणे उस्माननगर व रुत फाउंडेशन च्या वतीने प्लास्टिक मुक्त परिसर, कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते. समता विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त परिसराची शपथ देण्यात आली.

IMG 20250319 WA0025 Assistant Inspector of Police : नागरिकांनी आपला परिसर प्लास्टिक मुक्त करावे - स.पो.नि.पवार

वृक्षारोपण व संगोपनाचे महत्व सांगताना म्हणाले की , प्लास्टिक अथवा पॉलिथीन हे विघटनाशील असल्याने अनेक वर्ष तसेच टिकून राहते त्यामुळे त्या परिसरात डास व इतर उपद्रवी जंतूचा कीटकाचा उपद्रव वाढतो त्यामुळे आपल्याला विविध आजारांना बळी पडावे लागते परिणामी दवाखान्यातील खर्चात वाढ होत असे जाते तसेच जनावरे व इतर प्राणी चारा करत असताना त्यांच्या पोटात पॉलिथिन बॅग जाऊन ते मृत्यूमुखी पडतात राष्ट्रीय किंवा वस्तू जाळल्याने हवेत दूषित वायू पसरतात व पर्यावरण प्रदूषण वाढत जाते यावर उत्तम उपाय म्हणजे प्लास्टिकचा वापर टाळणे व अपरिहार्य परिस्थितीत वापर टाळण्याचा प्रयत्न करावे असे आवाहान यावेळी करण्यात आले.

कायर्यक्रमाला रुत फाउंडेशन चे नागनाथ चौगुले, निखील यादव, स. पोलिस उपनिरीक्षक गाडेकर , सुर्यवंशी , पो का. शिवपुजे ,ठाणे अंमलदार , जमदार भारती ठाण्यातील सर्व कर्मचारी, होमगार्ड तसेच गावातील राजीव सोनटक्के, सूर्यकांत मालीपाटील, समता माध्यमिक विद्यालय शाळेचे मु. अ. गणेश सोनवणे, पाटील सर,वडजे सर, नवसागरे, डांगे,वारकड, वाघमारे, स्वामी, सौ.कुलकर्णी, सौ.देशमुख आदी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments