HomeनांदेडStatement regarding pending demands : नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य...

Statement regarding pending demands : नांदेड जिल्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य कर्मचारी यांचा प्रलंबित मागण्या बाबत निवेदन

नांदेड| आज दि. 19 मार्च रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेले लातूर (हिवताप) विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ वैशाली तांभाळे मॅडम जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथे आले असता नांदेड जिल्हातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत तसेच राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना यांचे सुद्धा निवेदन देण्यात आले.

यावेळी लातूर येथील कार्यालयीन अधिक्षक शिवकुमार खडकीकर, सहाय्यक अधिक्षक राहुल जाधव, नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ राजेश्वर माचेवार उपस्थित होते. पुढीलप्रमाणे मागण्याचे आश्वासित प्रगती निवेदन देण्यात आले. योजना (10,20,30) लाभ देय बाबत लवकरच मा. विभागीय समितीची बैठक घेण्यात यावी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी यांची दि. 1.1.2025 रोजी विभागीय सेवा जैष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात यावी. आरोग्य कर्मचारी संवर्गातून आरोग्य निरीक्षक पदी पदोन्नती, क्षेत्र कर्मचारी संवर्गातून आरोग्य कर्मचारी पदी पदोन्नती करण्यात यावी या व इतर मागण्या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच मागण्या मान्य करण्यात येतील असे नांदेड जिल्हा संघटना पदाधिकारी यांना सांगण्यात आले.

यावेळी नांदेड जिल्हा हिवताप संघटना जिल्हाध्यक्ष व राज्य पदाधिकारी सत्यजीत टिप्रेसवार, सरचिटणीस माणिक गिते, उपाध्यक्ष चंद्रभान धोंडगे, सहसरचिटणीस माधव कोल्हे, जिल्हा शहरी विभागप्रमुख बालाजी निलपत्रेवार, आरोग्य पर्यवेक्षक संजय भोसले, राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष राजकुमार इंगळे, शेखर नातेवार, सतिश शिंदे,सचिन दळवी, रमेश चाटे, श्याम अवचार, वाघमारे, कौसल्ये, बालाजी कल्हाळे, शंकर मलदोडे, सुरेश पिंपळगावकर, शेख खलील, परमेश्वर मठदेवरु, विठ्ठल गवळी, कैलास कुंटूरवार, राहुल सवाचमल आदी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments