HomeकृषीGajanan Tuptewar honored : प्रगतिशील शेतकरी गजानन तूपतेवार यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते...

Gajanan Tuptewar honored : प्रगतिशील शेतकरी गजानन तूपतेवार यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान

हिमायतनगर। हिमायतनगर येथील प्रगतिशील शेतकरी गजानन प्रकाशराव तूपतेवार यांनी आपल्या शेतीत ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन घेऊन शेती क्षेत्रात भरारी घेतली आहे. या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढले असून, त्यांच्या या शेतीनिष्ठ कार्याचे दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील प्रगतिशील शेतकरी तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचीटनिस गजानन तुप्तेवार हे कृषी व्यापार क्षेत्रात साक्रीय आहेत, त्याच बरोबर ते स्वतः आणि मुलांच्या माध्यमातून शेती करतात, शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी मागील काही वर्षपासून शेतीत ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली, आत्तापर्यंत त्यांनी भरघोस उत्पादन घेतले.

त्यांना नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, दत्तकुमार कळसाईत जिल्हा कृषी अधिक्षक ह्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल आहे. त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरव करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून तृपतेवार यांचे अभिनंदन केले जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments