HomeनांदेडVoting ; निर्मिती नर्सिंग कॉलेज व गुरूकुल स्कूलतर्फे मतदानाचा जागर 87 नांदेड...

Voting ; निर्मिती नर्सिंग कॉलेज व गुरूकुल स्कूलतर्फे मतदानाचा जागर 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचा उपक्रम – NNL

नांदेड l निर्मिती नर्सिंग कॉलेज तसेच गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षातर्फे मतदानाचा जागर उपक्रम आज राबविण्यात आला.

नांदेड दक्षिण विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोट निवडणूकीसाठी स्विप कक्षामार्फत आज गुरुकुल इंग्लिश स्कूल वजीराबाद येथे मतदान जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमाचा आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस यांना लाभ झाला. निर्मिती नर्सिंग स्कुल ,नांदेड, मुक्ता साळवे बहुउद्देशिय सामाजिक संस्था नांदेड, तसेच गुरूकुल ईंग्लीश मिडियम स्कूल ,वजिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी स्वीप कक्षाच्या कविता जोशी यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी निर्मिती नर्सिंग स्कूलच्या सौ.उज्वला भावसार, नितिका बेंद्रे,अरुणा लामतुरे, उमा मद्दे, गुरूकुलच्या संचालिका वैशाली कुलकर्णी, सचिव, प्रकाश कुलकर्णी,
सारिका आचमे यांचे बहुमोल योगदान लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार संजय भालके यांनी मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments