Superintendent of Police Suraj Gurav : मराठीचा अभिमान जपू या ; मराठीतच संवाद साधू या – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव

NNL Team
By NNL Team

नांदेड| मराठी साहित्यातील लखलखते नक्षत्र आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयात मराठी साहित्य, स्पर्धा परीक्षा, इतिहास, विज्ञान आदी विविध विषयांवरील ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते.

यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. मराठीतील मान्यवर लेखक व कवी यांचे स्मरण ठेवून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

suraj 1 Superintendent of Police Suraj Gurav : मराठीचा अभिमान जपू या ; मराठीतच संवाद साधू या – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव
कार्यक्रमात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कुसुमाग्रज तसेच इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात तहसीलदार विकास बिरादार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, श्रद्धा रनखांबे, दिगांबर शिंदे, रघुवीर श्रीरामवार, राजू पाटील आदींचा सहभाग होता.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!